Download App

Earthquake : पाकिस्तानसह दोन देशांत भूकंप; घरांची पडझड, लोकांची पळापळ

Earthquake : दक्षिण आशियातील देशांत नैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले आहे. भूकंपांचे (Earthquake) प्रमाण वाढले आहे. आताही पुन्हा एकदा पाकिस्तान, तिबेट आणि पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानात (Pakistan) 4.2, तिबेटमध्ये 5.0 तर पापुआ न्यू गिनीमध्ये 6.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. अचानक जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले. या घटनेत घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली आहे. गाढ झोपेत असतानाच भुकंपाचे धक्के बसू लागल्याने लोकांनी पळत घरे सोडली.  या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, अनेक घरांची पडझड झाल्याची माहिती आहे.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप! 129 जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

भूकंप का होतात ?

पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स एकमेकांना आदळल्यास जी ऊर्जा बाहेर पडते त्यालाच भूकंप असे म्हणतात. या प्लेट्स भूगर्भात अत्यंत कमी गतीने सरकत असतात. वर्षाच्या हिशोबात सांगायचे झाले तर या प्लेट्स दरवर्षी त्यांच्या जागेवरून 4 ते 5 मिमी सरकरतात. या काळात हालचाली होताना प्लेट्स एकमेकांवर आदळण्याचे प्रकारही घडतात. असे जर झाले तर आपल्याकडे भूकंप येतो, असे तज्ज्ञ सांगतात.

याआधी नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. दिल्ली एनसीआरमध्ये 60 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते असे येथील नागरिकांनी सांगितले. भारतात याआधीही भूकंप झाला. मात्र या भुकंपात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात दोन हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले होते. त्यानंतर आता नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 129 जणांचा मृत्यू झाला होता.

Earthquake Nepal: नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, बिहारमध्येही हादरली जमीन

आता पुन्हा शेजारील पाकिस्तान आणि तिबेटमध्ये भूकंप झाला आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या भागात आता वारंवार भूकंप येत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानशेजारील अफगाणिस्तानाच असाच विनाशकारी भूकंप झाला होता. या भुकंपात दोन हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू  झाला होता. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानात भूकंप झाला आहे. मागील काही दिवसांपासून दक्षिण आशियातील (Pakistan Earthquake) अनेक देशांत भूकंपांचे झटके बसत आहेत. भारत, नेपाळ, अफगाणिसस्तान, बांग्लादेशनंतर आता पाकिस्तानात पुन्हा एकदा जमीन हादरली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज