Download App

आता ‘या’ ठिकाणी 7.0 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहे. यातच अनेक ठिकाणी शक्तिशाली भूकंप देखील झाले आहे. यातच पुन्हा एकदा अशीच एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) आणि तिबेटमध्ये (Tibet) भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. तिबेटमधील शिझांग (Sarang) शहरात रविवारी-सोमवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार सोमवारी पहाटे वायव्य पापुआ न्यू गिनीला 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी रात्री तिबेटमधील शिझांग शहरातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शिजांगमध्ये दुपारी 1.12 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर मोठ्या प्रमाणात लोक घरातून रस्त्यावर आणि मैदानावर आले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी मोजली गेली. सध्या घटनास्थळी झालेल्या नुकसानीसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

राहुल गांधी आज दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणार

त्सुनामीचा इशारा दिला
पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूकंपानंतर सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे. लोकसंख्या कमी असलेल्या याच भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या भूकंपानंतर झालेल्या नुकसानीबाबतची माहिती समोर आली नाही आहे. मात्र याबाबतची माहिती संकलन केली जात आहे. यापूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामध्ये 45 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

ऋषी सिंहने जिंकले इंडियन आयडॉल 13 चं विजेतेपद

भूकंपाच्या वेळी काय करावे? जाणून घ्या
भूकंप झाल्यास नेहमी शांत राहून इतरांना धीर दिला पाहिजे.
अशावेळेस तातडीने सर्वात सुरक्षित ठिकाण शोधले पाहिजे.
मोकळ्या जागेपासून, इमारतींपासून दूर उभे राहिले पाहिजे.
घरामध्ये राहणारे लोक जे वेळेत बाहेर पडू शकत नाहीत त्यांनी डेस्क, टेबल किंवा बेडच्या खाली लपावे.
बाहेर असल्यास, इमारती आणि वीज तारांपासून दूर जा

Tags

follow us