Download App

Earthquake : तुर्की पाठोपाठ आता इंडोनेशियात भूकंपाचे धक्के, 6.3 रिश्टर स्केलची नोंद

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये मोठा विध्वंस झाला आणि त्यानंतर गुरुवारी अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंप (Earthquake ) जाणवला, जो रिश्टर स्केलवर 6.8 मोजला गेला. एकीकडे हे सुरु असताना मात्र शुक्रवारी सकाळी इंडोनेशियात भूकंप हादरा जाणवला आणि रिश्टर स्केलवरील भूकंपाची तीव्रता 6.3 वर मोजली गेली. यूएसजीएसच्या मते, इंडोनेशियाच्या टोबेलोच्या उत्तरेस 177 कि.मी. अंतरावर भूकंप झाला. यूएसजीएसच्या मते, भूकंप केंद्र 99 किमीच्या खोलीवर होते. तथापि, भूकंपातून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! राज्यात १५ मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार, महसूल मंत्री विखेंची माहिती

दरम्यान यापूर्वीही इंडोनेशियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच 10 जानेवारी रोजी इंडोनेशियात भूकंप झाला होता, जो 7.7 होता आणि त्याचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली 97 किमी (60.27 मैल) होते. तथापि, भूकंप दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर मागील वर्षी, 2022 मध्ये इंडोनेशियात झालेल्या भूकंपामुळे विनाश झाला. भूकंपाची तीव्रता 5.6 मोजली गेली. भूकंपामुळे 268 हून अधिक लोक ठार झाले, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले.

प्रवीण तरडे यांचं फेसबुकनंतर आता इंस्टा अकाऊंट हॅक

तुर्की आणि सीरियामध्ये फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपानंतर आतापर्यंत मृत्यूची संख्या सुमारे, 45000 हजाराहून अधिक पर्यंत वाढली आहे. एकट्या तुर्कीमध्ये 43 हजाराहून अधिक मृतदेह सापडले आहेत. तुर्कीचे अंतर्गत मंत्री सुलेमन सोयलू म्हणाले की, आतापर्यंत देशात एकूण, 43,566 मृतदेह सापडले आहेत. या विनाशकारी भूकंपामुळे तुर्कीमधील अनेक शहरे नष्ट झाली आहेत. या आपत्तीत जिवंत उर्वरित लोक बेघर झाले आहेत आणि आतापर्यंत बचाव कार्य चालू आहे. विनाशानंतरही भूकंपाची प्रक्रिया सुरूच आहे. तुर्कीमध्ये काही अंतराने भूकंप हादरे जाणवत आहेत.

Tags

follow us