Elon Musk India Visit for First time : इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचे ( Tesla ) मालक एलन मस्क ( Elon Musk ) हे या महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर ( India Visit ) येणार आहेत याबद्दल त्यांनी स्वतः एक्स या त्यांच्या च्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये एलन मस्क म्हणाले आहेत की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्या भेटीसाठी मी उत्सुक आहे.
कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे कर्क राशीचा आजचा दिवस
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या 22 ते 27 तारखे दरम्यान एलन मस्क हे त्यांच्या पहिल्याच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामध्ये त्यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर भारतामध्ये मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्टलाच्या प्लांट होणार असल्याची घोषणा होऊ शकते.
Looking forward to meeting with Prime Minister @NarendraModi in India!
— Elon Musk (@elonmusk) April 10, 2024
दरम्यान कित्येक दिवसांपासून मस्क हे भारतात टेस्ला कार निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यासाठी योग्य जागेची आणि शहराची निवड करत आहेत. असं देखील सांगण्यात येत आहे की, सुरुवातीला मस्क हे भारतात टेस्लाच्या प्लांटमध्ये 200 कोटी डॉलरची गुंतवणूक करू शकतात. तसेच टेस्टला या संदर्भात भारतीय उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्याशी देखील चर्चा करत आहे. त्यामुळे टेस्लाचा हा प्रकल्प महाराष्ट्र किंवा गुजरात या दोन राज्यांपैकी एका राज्यात होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
नाना पटोलेंचा अपघात की कट? काँग्रेसला शंका, EC ला पत्रच धाडलं
तर दुसरीकडे या वर्षीच्या मार्च महिन्यात भारत सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल्स धोरण सादर केलं आहे. या धोरणाचा उद्देश इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे हा आहे. त्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा निर्माण करण्यावर देखील यावर्षी भर देण्यात येणार आहे. या धोरणाअंतर्गतच अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी टेस्लाचा प्रकल्प देखील भारतात येण्याची शक्यता वाढली आहे. तर मस्क यांच्या या दौऱ्यामुळे याला आणखी दुजोरा मिळाला आहे.