Download App

एलोन मस्कने अचानक विकले X ; ‘या’ कंपनीसोबत तब्बल 33 अब्ज डॉलर्सचा करार केला

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेक दिग्गज एलोन मस्कने (Elon Musk) लोकप्रिय सोशल साइट एक्स (X) विकला आहे.

  • Written By: Last Updated:

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेक दिग्गज एलोन मस्कने (Elon Musk) लोकप्रिय सोशल साइट एक्स (X) विकला आहे. मस्कने यासाठी त्यांच्या स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी एक्सई एआय (X I) सोबत 33 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. याबाबत स्वतः एलोन मस्कने माहिती दिली आहे.

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सल्लागार असलेल्या मस्कने 2022 मध्ये मस्कने ट्विटर नावाची साइट 44 अब्ज डॉलर्सना विकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती आणि वापरकर्ता पडताळणी यावरील धोरणे बदलली आणि त्याचे नाव बदलून X ठेवले.

xAI आणि X चे भविष्य एकमेकांशी जोडलेले 

याबाबत माहिती देत मस्क यांनी X वर म्हटले की,  X, AI आणि X चे भविष्य एकमेकांशी जोडलेले आहे. आम्ही अधिकृतपणे डेटा, मॉडेल्स, गणना, वितरण आणि प्रतिभा एकत्रित करण्याचे पाऊल उचलतो. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे अब्जावधी लोकांसाठी अधिक स्मार्ट, अधिक अर्थपूर्ण अनुभव निर्माण होतील, तर सत्य शोधण्याच्या आणि ज्ञान वाढवण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले जाईल. असं त्यांनी एक्सवर म्हटले आहे.

म्यानमार-थायलंडमध्ये प्रचंड विनाश, शक्तीशाली भूकंपात 150 जणांचा मृत्यू, 800 जखमी

follow us