म्यानमार-थायलंडमध्ये प्रचंड विनाश, शक्तीशाली भूकंपात 150 जणांचा मृत्यू, 800 जखमी

Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी झालेल्या 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा (Myanmar Earthquake) अनेकांना फटका बसला आहे. या भूकंपात अनेक इमारती उद्व्धस्त झाले आहे तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, या शक्तीशाली भूकंपामध्ये 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून 800 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सागाईंगच्या वायव्येस 10 किलोमीटर खोलीवर होता. म्यानमार, थायलंड, ईशान्य भारत आणि चीनच्या काही भागात 28 मार्च रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
थायलंडमध्येही भूकंपाचे धक्के, 33 मजली इमारत कोसळली
या शक्तीशाली भूकंपाचे धक्के थायलंडमध्येही (Thailand Earthquake) जाणवले. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली बहुमजली इमारत कोसळून किमान 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 16 जण जखमी झाले आणि 101 जण बेपत्ता असल्याच बोलले जात आहे. थायलंडचे उपपंतप्रधान सुरिया जुआंगरुंगकिट यांनी या घटनेचे वर्णन “मोठी दुर्घटना” असे केले आणि बचाव कार्य सुरू असल्याचे सांगितले.
7.7 magnitude earthquake hits Southeast Asia, mainly impacting Myanmar and Thailand.
— Pop Base (@PopBase) March 28, 2025
म्यानमारमध्ये प्रचंड विनाश, हजारो जखमी
या शक्तीशाली भूकंपामुळे म्यानमारमध्ये प्रचंड विनाश झाला आहे. याबाबत माहिती देताना म्यानमारचे लष्करप्रमुख वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांनी सांगितले की, आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 800 लोक जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने मृतांची संख्या 1000 पेक्षा जास्त असू शकते असा अंदाज वर्तवला आहे.
मोठी बातमी! म्यानमारनंतर अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के, 4.7 तीव्रतेसह जमीन हादरली
भूकंपाचे केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मंडालेजवळ होते आणि त्याची तीव्रता 7.7 इतकी होती. यानंतर 6.4 तीव्रतेचे अनेक आफ्टरशॉक आले. या भूकंपामुळे मंडाले, नायपिडॉ, यांगून आणि इतर अनेक शहरांमधील इमारती, पूल आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.