मोठी बातमी! म्यानमारनंतर अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के, 4.7 तीव्रतेसह जमीन हादरली

मोठी बातमी! म्यानमारनंतर अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के, 4.7 तीव्रतेसह जमीन हादरली

Afghanistan Earthquake : शुक्रवार 28 मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडला भूकंपामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे तर आता अफगाणिस्तानात भूकंपाचे (Afghanistan Earthquake) धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राक़डून देण्याच आलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे 5.16 वाजता अफगाणिस्तानला रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचे केंद्र 180 किमी खोलीवर होते. भूकंपाचे केंद्रबिंदू अक्षांश 36.50 उत्तर आणि रेखांश 71.12 पूर्व येथे नोंदवले गेले.

तर दुसरीकडे म्यानमार आणि बँकॉकमध्ये शुक्रवार , 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपामुळे अनेकांना नुकसान सहन करावे लागले आहे. म्यानमारमध्ये शुक्रवार, 28 मार्च रोजी सकाळी 11.50 वाजता 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेसह जमीन हादरली आणि याचा फटका अनेक इमारतींना बसला.

सकाळी 11.50 वाजता भारतीय प्रमाणवेळेस झालेल्या भूकंपानंतर काही मिनिटांनी 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने म्हटले आहे की म्यानमारमध्ये रिश्टर स्केलवर 4.9 तीव्रतेचा भूकंप झाला आणि तो 7.2 तीव्रतेच्या पहिल्या भूकंपानंतरचा तिसरा भूकंप होता. माहितीनुसार, चतुचक जिल्ह्यात बांधकामाधीन असलेली 30  मजली गगनचुंबी इमारत देखील भूकंपामुळे कोसळली.

बीसीसीआयच्या केंद्रीय कराराबद्दल मोठे अपडेट्स, नवीन खेळाडूंना लॉटरी लागण्याची शक्यता…

थायलंडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इमर्जन्सी मेडिसिनचा हवाला देत द नेशन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत 43 कामगार अडकले होते. म्यानमारमधून सीएनएनने मिळवलेल्या व्हिडिओमध्ये मंडालेमधून वाहणाऱ्या इरावती नदीवरील एक रस्ता पूल धूळ आणि पाण्याच्या ढगात नदीत कोसळताना दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या