मोठी बातमी! अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रता 4.2

मोठी बातमी! अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रता 4.2

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहे. माहितीनुसार, शनिवारी अफगाणिस्तानात (Afghanistan) 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला, ज्याची खोली 120 किमी असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय भूकंप केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 17 मे 2025 रोजी पहाटे 4:26 वाजता अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला. भूकंप 36.37 अंश उत्तर अक्षांश आणि 69.83 अंश पूर्व रेखांशावर होता. भूकंपाची खोली 120 किलोमीटर नोंदली गेली. तथापि, भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

तर दुसरीकडे शुक्रवारी चीनमध्ये (China) भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी मोजण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सकाळी भारतीय वेळेनुसार 6:29 वाजता चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी मोजण्यात आली आणि त्याची खोली सुमारे 10 किलोमीटर खाली होती, अक्षांश 25.05 उत्तर आणि रेखांश 99.72 पूर्व.

सावध, डिलिव्हरी बॉक्स घोटाळा बँक खाते रिकामे करणार, पार्सल बॉक्स फेकून देण्यापूर्वी ‘हे’ काम कराच

तर गुरुवारी तुर्कस्तानमध्ये (Turkey) 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता रिश्टर स्केलवर मध्यम तीव्रतेच्या या भूकंपाचे केंद्रबिंदू देशाच्या मध्य अनातोलिया प्रदेशातील कोन्या प्रांतात होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube