सावध, डिलिव्हरी बॉक्स घोटाळा बँक खाते रिकामे करणार, पार्सल बॉक्स फेकून देण्यापूर्वी ‘हे’ काम कराच

सावध, डिलिव्हरी बॉक्स घोटाळा बँक खाते रिकामे करणार, पार्सल बॉक्स फेकून देण्यापूर्वी ‘हे’ काम कराच

Delivery Box Scam : गेल्या काहीदिवसांपासून आपल्या देशात ऑनलाईन खरेदीचे (Online Shopping) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज आपल्या देशात Amazon आणि Flipkart वरुन दररोज हजारो रुपयांची खरेदी होत आहे. या प्लॅटफॉर्मवरुन दररोज वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. जेव्हा आपण या प्लॅटफॉर्मवरुन काही वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्याला एक बॉक्स मिळतो. बॉक्सची अनबॉक्सींग करुन आपण बॉक्स फेकून देतो मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या या चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. ऑनलाईन फसवणूक करणारे आता डिलिव्हरी बॉक्स घोटाळा करुन ग्राहकांची आर्थिक फसवणूक करत आहे.

डिलिव्हरी बॉक्स घोटाळा काय?

कोणतीही वस्तू ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर आपण बॉक्स फेकून देतो मात्र आपला पत्ता, नंबर आणि नाव हे सर्व पार्सल बॉक्सवर लिहिलेला असतो. फ्लिपकार्टवर तुम्ही कोणत्या कंपनीचे आणि कोणते उत्पादन ऑर्डर केले आहे हे लिहिलेले असते. त्यामुळे जेव्हा हे पॅकेजिंग किंवा बॉक्स फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागले की, ते तुमची सर्व माहिती सहजपणे मिळवतात आणि या माहितीचा वापर करत फसवणूक करणारे ग्राहकांची आर्थिक फसवणूक करतात.

फसवणूक कशी होऊ शकते?

जेव्हा फसवणूक करणाऱ्याला पॅकेजद्वारे ग्राहकांची सर्व माहिती मिळते, तेव्हा तो प्रथम ग्राहकाशी व्हॉट्सॲप, मेसेज, ई-मेल किंवा कॉलद्वारे संपर्क साधेल आणि ज्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून खरेदी केली आहे. त्या शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या नावाचा फायदा घेऊन, ते बनावट ऑफर्स आणि कूपन डिस्काउंटच्या बहाण्याने  एक लिंक पाठवणार मात्र लिंकमध्ये व्हायरस असल्याने फोन हॅक होतो आणि फोन हॅक होताच फसवणूक करणारे तुमच्या महत्त्वाच्या ॲप्समध्ये एंट्री करुन तुमची आर्थिक फसवणूक करु शकतात.

आमचे सहकारी नेहमी काहीतरी घेऊन येतात अन्…, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला 

तुम्ही सुरक्षित कसे राहू शकता?

जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर मिळेल तेव्हा पार्सल बॉक्स फेकून देण्यापूर्वी बॉक्सवरील सर्व माहिती काढून टाक आणि जर बॉक्सवरील माहिती काढता येत नसेल तर बॉक्सवरील माहिती योग्यरित्या नष्ट करा. तसेच जर तुम्हाला ऑफरबाबात काही कॉल किंवा मेसेज आले तर तुम्ही ऑफरबाबत आधी अधिकृत वेबसाइटला जाऊन याची माहिती घ्यावी. तसेच तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करु नका.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube