आनंदाची बातमी! iPhone 15, iPhone 14 मिळत आहे ‘इतक्या’ स्वस्तात

  • Written By: Published:
आनंदाची बातमी! iPhone 15, iPhone 14 मिळत आहे ‘इतक्या’ स्वस्तात

iPhone 15 Price : जर तुम्ही देखील iPhone 15, iPhone 15 Plus किंवा iPhone 14 खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात 09 सप्टेंबर रोजी iPhone 16 लाँच झाल्यानंतर iPhone 15, iPhone 15 Plus आणि iPhone 14 च्या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही आता स्वस्तात तुमच्यासाठी नवीन iPhone 15, iPhone 15 Plus किंवा iPhone 14 खरेदी करू शकतात.

एका रिपोर्टनुसार Apple ने मोठा निर्णय घेत iPhone 15, iPhone 15 Plus आणि iPhone 14 10 हजार रुपयांनी स्वस्त केले आहे. त्यामुळे तुम्ही आता कमी किमतीमध्ये नवीन iPhone खरेदी करू शकतात.

iPhone 14 च्या नवीन किंमती

रिपोर्टनुसार iPhone 14 च्या 128 जीबी स्टोरेजची किंमत यापूर्वी 69,600 रुपये होती ती आता 59,900 रुपये करण्यात आली आहे तर 256 जीबी व्हेरिएंटची किंमत यापूर्वी 79,600 होती ती आता 69,900 रुपये करण्यात आली आहे. तर iPhone 14 च्या 512 GB व्हेरिएंटची पूर्वीची किंमत 99,600 रुपये होती तर आता ती किंमत 89,900 रुपये करण्यात आली आहे.

iPhone 15 च्या नवीन किंमती

जर तुम्ही iPhone 15 128 GB स्टोरेज फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त 69,900 रुपये खर्च येणार आहे. यापूर्वी ही रक्कम 79,600 रुपये होती. तर 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,600 रुपयांवरून 79,900 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे. याच बरोबर 512 जीबी व्हेरिएंटसाठी तुम्हाला आता 99,900 रुपये मोजावे लागणार आहे यापूर्वी ही रक्कम 1,06,600 होती.

हरियाणात भाजपकडून मोठा निर्णय, विनेश फोगटविरोधात ‘कॅप्टन’ ला उमेदवारी जाहीर

iPhone 15 Plus च्या नवीन किंमती

iPhone 16 लाँच झाल्यानंतर iPhone 15 Plus च्या 128 GB ची किंमत 89,600 रुपयांवरून 79,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे तर 256 GB व्हेरियंटसाठी तुम्हाला 99,600 रुपयांऐवजी 89,900 रुपये मोजावे लागणार आहे. याच बरोबर 512 GB साठी तुम्हाला 1,09,900 रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वी ही रक्कम 1,19,600 रुपये होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube