अफगाणिस्तानात भूकंप! नेपाळपासून बांग्लादेश अन् जम्मू काश्मीरही हादरले

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानातील हिंदू कुश भागात आज पहाटे जोरदार भूकंपाचे (Afghanistan Earthquake) धक्के बसले. या भुकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे धक्के शेजारील तिबेट, बांग्लादेश आणि भारतातील जम्मू काश्मीरातही जाणवले. हा भूकंप बुधवारी पहाटे 4 वाजून 43 मिनिटांनी झाला. एनसीएक्सने याबाबत एक्स पोस्ट केली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या 75 किलोमीटर खोलवर होता अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र (UNOCHA) कार्यालयानुसार अफगाणिस्तानात पूर, भूस्खलन आणि भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे सातत्याने येत आहेत. UNOCHA ने सांगितले की अफगाणिस्तानात सातत्याने येणारे भूकंप मोठे नुकसान करतात. कमकुवत घटकांना याचा सर्वाधिक फटका बसतो. भूकंपाच्या अनेक धक्क्यांतून सावरण्याची क्षमता या लोकांत नाही.
EQ of M: 5.9, On: 16/04/2025 04:43:58 IST, Lat: 35.83 N, Long: 70.60 E, Depth: 75 Km, Location: Hindu Kush, Afghanistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjcVGs @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/cdndqE0OQR— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 15, 2025
रेडक्रॉस नुसार अफगाणिस्तानात शक्तीशाली भुकंपांचा इतिहास राहिला आहे. हिंदू कुश पर्वत रांग भूगर्भीय रुपाने सक्रिय आहे. या भागात दरवर्षी भूकंप येत असतात. अफगाणिस्तान भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेटमध्ये अनेक फॉल्ट लाइनवर स्थित आहे. यातील एक फॉल्ट लाइन सरळ हेरात वरून जाते. अफगाणिस्तानात भूकंपाची तीव्रत 5.9 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. हा मध्यम श्रेणीचा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. या तीव्रतेचा भूकंप जर दाट लोकसंख्या असलेल्या भागात झाला असता तर मोठे नुकसान झाले असते. या भूकंपात मात्र कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
हार्वर्ड विद्यापीठाला ट्रम्पचा दणका! 2.2 अब्ज डॉलर्सचे अनुदान थांबवले, धक्कादायक कारण…
आशियाई देशांत भुकंपाचे सत्र
याआधी ताजिकिस्तानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप आला होता. मागील दोन दिवसांत मध्ये आशियाई देशांत आलेला हा तिसरा भूकंप आहे. रविवारी ताजिकिस्तानात दोन भूकंपाचे धक्के बसले. यातील पहिला धक्का 6.1 तर दुसरा धक्का 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. याआधी म्यानमारमध्ये शक्तीशाली भूकंप आला होता. या भूकंपाने मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला. तर काही लोक अजूनही बेपत्ता आहेत. म्यानमारमधील भूकंपाचा परिणाम थायलंड आणि भारतातील काही भागात दिसून आला होता.