म्यानमार, थायलंडमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप; इमारती कोसळल्या, बँकॉकमध्ये आणीबाणी

  • Written By: Published:
म्यानमार, थायलंडमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप; इमारती कोसळल्या, बँकॉकमध्ये आणीबाणी

Myanmar thailand bangkok earthquake: शुक्रवारी दुपारी म्यानमार आणि थायलंडमध्ये शक्तिशाली भूकंप झालाय. बँकॉक आणि थायलंडच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे बँकॉकमधील इमारती हादरत असताना हजारो लोक जीव वाचविण्यासाठी पळत होते. म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात थायलंडमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बँकॉकमधील शहरी रेल्वे व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी नोंदविण्यात आली आहे.

भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले शहरात मोठे नुकसान झाले आहे. या शहरात गगनचुंबी उमारती कोसळल्या आहेत. या शहराची लोकसंख्या 16 लाख इतकी आहे. मांडले शहराजवळच भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे थायलंडमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. जर्मन रिसर्च सेंटर जियोसायन्सच्या माहितीनुसार भूकंप हा दहा किलोमीटर जमिनीखाली होता. म्यानमारची राजधानी नेपीडॉ आणि सर्वात मोठे शहर यंगून शहरात मोठे नुकसान झाले आहे.

सहा राज्यात आणीबाणी

मंडाले शहरात भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. शहरातील इमारती कोसळल्या आहेत. मंडाले आणि यंगून शहरातील रस्त्यांवर तडे गेले आहेत. म्यानमार लष्कराने देशातील मध्य भागात आणीबाणी जाहीर केली आहे. यात मांडले आणि नेपीडॉ शहराचा भाग आहे. या व्यतिरिक्त सागाइंग, बागो, मॅगवेसह पूर्व भागातील शान राज्यात आणाबीणी जाहीर करण्यात आलीय.

मंडाले शहरात सुभाषचंद्र बोस कैदेत
इरावदी नदीकिनारी मंडाले शहर वसलेले आहे. हे शहर सांस्कृतिक आणि धार्मिक राजधानी आहे. येथे बौद्ध मठ आणि मोठे महाल आहेत. येथून अनेक राजांनी देश चालविला आहे. पूर्व रॉयल पॅलेसमध्ये म्यानमारचा राजा राहत होता. तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आझाद हिंद फौजचे सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांनी मंडाले शहरात कैद ठेवले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube