Download App

एलॉन मस्क खरेदी करणार Silicon Valley Bank?

  • Written By: Last Updated:

Elon Musk :  अमेरिकेसह संपूर्ण देशाला स्टार्टअप फंडिंग देणाऱ्या सिलिकॉन वॅली बँकेवर मोठे संकट आले आहे. अमेरिकेच्या रेग्युलेटरी बँकेने ही बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याचे कारण या बँकेची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

यानंतर या बँकेला एलॉन मस्क खरेदी करणार का याची चर्चा सुरु झाली आहे. यानंतर रेजरचे सीईओ मिन लियांग टैन यांनी एक ट्विट केले आहे. एलॉन मस्क हे अडचणीत सापडलेल्या SVB बँकेला खरेदी करु शकतात व त्याला डिजिटल बँक बनवू शकतात.

Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…

रेजरचे साईओ यांच्या ट्विटवर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी उत्तर दिले आहे. मी या विचाराचे स्वागत करतो. यानंतर असे बोलले जात आहे की, एलॉन मस्क यांना ही बँक खरेदी करण्यात रस आहे व ते या बँकेला खरेदी करु शकतात.

Infosys : मोहित जोशींचा इन्फोसिसला रामराम; आता देणार महिद्रांची साथ

स्टार्टअप केंद्रित कर्जदार बँक SVB फायनान्शियल ग्रुप 2008 नंतरचे सर्वात मोठे बँकिंग संकट म्हणून उदयास आले आहे. शुक्रवारी ते बंद होते. या समूहाचे शेअर्स 70 टक्क्यांनी घसरले होते. SVB फायनान्शिअल ग्रुपच्या प्रमुखांनी एका व्हिडिओ कॉन्फ्रेन्सद्वारे कर्मचाऱ्यांना सांगितले की, बँकिंग रेग्युलेटरसह भागीदार शोधण्याचे काम केले जात आहे. ते म्हणाले की, करार अडकेल याची शाश्वती नाही. सध्या, फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ने नियंत्रण ठेवले आहे.

Tags

follow us