Download App

धक्कादायक, कॉमेडी किंग कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर अंधाधुंद गोळीबार, व्हिडिओ व्हायरल

 Kapil Sharma Cafe :  कॉमेडी किंग कपिल शर्माच्या (Kapil Sharma) रेस्टॉरंटवर गोळीबार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

 Kapil Sharma Cafe :  कॉमेडी किंग कपिल शर्माच्या (Kapil Sharma) रेस्टॉरंटवर गोळीबार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये (Canada) या रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं होतं. कपिलने सरे (Surrey) शहरात कॅप्स कॅफे (Cap’s Cafe) या नावाने रेस्टॉरंट सुरु केलं होतं.  या रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला असून गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेचा कार्यकर्ता आणि दहशतवादी हरजीत सिंग लाडी (Harjit Singh Ladi) याने कपिल शर्माच्या काही वक्तव्यांचा हवाला देत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

हरजीत सिंग लाडी याचा एनआयकडून (NAI) देखील शोध सुरु आहे. तर दुसरीकडे गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक कार रेस्टॉरंटजवळ येते आणि रेस्टॉरंटच्या काचांवर गोळीबार करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने कारमधून किमान नऊ वेळा गोळ्या झाडल्या.

हरजीत सिंग लड्डी कोण आहे?

दहशतवादी हरजीत सिंग लड्डी पंजाबच्या नवा शहर येथील रहिवासी असून बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेचा कार्यकर्ता आहे. तो सर्वाधिक दहशतवाद्यांच्या शोधात असणाऱ्या एनआयएच्या यादित आहे.  पंजाबमध्ये हिंदू संघटनेचे नेते विश्व हिंदू परिषदचे विकस प्रभाकर ऊर्फ विकास बग्गा यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणात एनआयने गेल्या वर्षी हरजीत सिंग लड्डीविरोधात आरोपपत्र देखील दाखल केलं आहे.

पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड

हरजीत सिंग लड्डीसह या प्रकरणात एनआयएकडून  पाकिस्तानस्थित बीकेआयचा प्रमुख वधवा सिंग आणि इतर चार जणांविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

follow us