पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड

पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड

Ahilyanagar Police :  पुणे शहरातील दोन सराईत गुंडांना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) सापळा लावून कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्या जवळ चार पिस्तूल, 34 काडतुसे तसेच इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. हे गुन्हेगार कोणालातरी मारण्याच्या उद्देशाने जात असावे, असा निष्कर्ष सुरुवातीच्या तपासामध्ये निघाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी पत्रकारांना दिली. रोहन राजू गाडे (वय 30, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे), नवनाथ अंकुश ढेणे (वय 29, रा.सुरभी कॉलनी रोड, वारजे माळवाडी, ता.हवेली, जि. पुणे) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे (Pratap Darade) यांच्या पथकाला अहिल्यानगर शहरांमध्ये एका कारमध्ये काहीजण शास्त्रासह आले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी शहरातील मार्केट यार्ड जवळ असलेल्या क्लेरा बुश हायस्कूल या ठिकाणी सापळा लावला. या ठिकाणी चार चाकी लाल रंगाची कार उभी असल्याची लक्षात आली व त्या कारमध्ये दोन जण होते. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांची गडबड झाली. पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ छापा टाकला व त्यांच्या गाडीमध्ये चार गावठी कट्टे, 2 मॅग्झिन, 34 जिवंत काडतूस, 3 मोबाईल फोन व 1 लाल रंगाची स्विफ्ट चारचाकी वाहन असा आठ लाख 66 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे अधीक्षक घाडगे यांनी सांगितले. हे दोघेही पुणे येथील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खुनासह चोऱ्या दरोडे यासारखे  गंभीर गुन्हे दोघांवर दाखल असल्याचे अधीक्षक घाडगे यांनी सांगितले.

या दोघांनी अहिल्यानगर येथे येऊन शस्त्र नेमके कोणासाठी त्यांनी आणले होते याचा पोलीस शोध घेत आहे पण प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार यातील एका आरोपीने मे महिन्यामध्ये पुण्यामध्ये अमित लकडे याच्यावर गोळीबार केला असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे चार गावठी कट्टे व मॅगझिन सापडले. ते त्यांनी मध्यप्रदेश या ठिकाणी खरेदी केले असल्याचे सांगितले. त्यांना नेमके कोणाला मारायचे होते व नेमके हे कोणाला शस्त्र द्यायचे होते याचा पोलीस शोध घेत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले. त्यांच्याकडील कारमध्ये तीन नंबर प्लेट आढळून आल्या आहेत. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी सलीम रमजान शेख यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करत आहेत.

Romance Ki Barsaat मध्ये मोठा ट्विस्ट, अनुपमा-अनुज दिसणार एकत्र?

करणार होते जिवघेणा हल्ला

पुण्यामध्ये दयानंद शिंदे याची टोळी आहे, त्या टोळीतीळ अमित लकडे याच्यावर गाडे याने मध्यंतरी फायरिंग केले होते. त्यामध्ये गाडे हा आरोपी फरार होता. त्यातील हा आरोपी आहे. पुण्यातील बाप्पू नायर टोळीतील स्वप्नील गुळवे याच्या बरोबर ताब्यात घेतलेल्या दोघांचे वाद झाले होते. त्यातून गुळवे याच्यावर गोळीबार करण्याचा या दोघांचा प्लॅन असल्याचे घार्गे यांनी प्राथमिक तपासात पुढे आल्याचे सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube