Download App

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाला लाखो डॉलर्सचा दंड, पॉर्न स्टारला द्यावी लागणार नुकसान भरपाई

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : अमेरिकेचे (US President) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना एका पॉर्न स्टार अभिनेत्रीला अवैधरित्या पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मॅनहॅटन न्यायालयात दाखल झाले होते. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर 34 आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांना 1.22 लाख डॉलर्सचा दंडही ठोठावला आहे. हे पैसे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels) दिले जाणार आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या सुनावणीदरम्यान तीन उदाहरणे देण्यात आली. पहिल्यात ट्रम्प टॉवरच्या सुरक्षारक्षकाला 30,000 डॉलर्स, महिलेला 150,000 डॉलर्स आणि तिसऱ्यात पॉर्न स्टार अभिनेत्रीला 130,000 डॉलर्स देण्याचे सांगितले. त्याचवेळी, न्यूज एजन्सी एएफपीनुसार, अमेरिकन न्यायाधीशांचे म्हणणे आहे की ट्रम्प विरुद्धचा खटला जानेवारी 2024 पासून सुरू होऊ शकतो.

Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये हजर झाल्यानंतर फ्लोरिडाला परतले. कडेकोट बंदोबस्तात ट्रम्प न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर झाले. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 35,000 हून अधिक पोलिस आणि गुप्तहेर सेवा एजंट सज्ज होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्यावरील आरोप सांगून सोडून देण्यात आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प 8 कारच्या ताफ्यात कोर्टात पोहोचले आणि थेट कोर्टात गेले.

भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 च्या सुमारास ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर झाले. यावेळी न्यायाधीशांनी ग्रँड ज्युरींनी केलेले आरोप सीलबंद लिफाफ्यात त्यांच्याकडे सुपूर्द केले. ट्रम्प यांना स्टॉर्मी डॅनियलला 1,22,000 डॉलर्स नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी न्यायालयाला सांगितले की, ते निर्दोष आहेत आणि 34 प्रकरणांमध्ये त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत.

Tags

follow us