Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे भारतात होणाऱ्या G20 परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. रॉयटर्सने क्रेमलिनच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. G20 शिखर परिषद (G20 Summit) भारतामध्ये पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये होणार आहे. पुतिन यांच्या अनुपस्थितीचे कारण भारत-अमेरिका मैत्री नसून दुसरेच समोर आले आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G20 परिषदेसाठी भारत भेटीवर येण्याची शक्यता कमी आहे. सध्या त्यांचे विशेष लक्ष लष्करी तयारीवर आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडून अटक वॉरंट
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयने (ICC) पुतीन यांच्यावर युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांचा आरोप करत अटक वॉरंट जारी केले आहे. मात्र, क्रेमलिनने हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. याचा अर्थ व्लादिमीर पुतिन यांना परदेशात प्रवास करताना अटक होण्याचा धोका आहे.
Neeraj Chopra : नीरज चोप्राची वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक
ब्रिक्स परिषदेलाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत वैयक्तिकरित्या नव्हे तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला होता. यादरम्यान त्यांनी युक्रेनमधील डोनबास प्रदेशात राहणाऱ्या लोकांविरुद्ध पाश्चात्य देशांवर युद्ध छेडण्याचा आरोप केला होता.
Asia Cup : वेगवान गोलंदाज की फिरकीपटू? श्रीलंकेतील मैदानांवर कुणाचं वर्चस्व
ते म्हणाले की, रशियाच्या विशेष लष्करी कारवाईचा उद्देश ते युद्ध संपवणे आहे. पाश्चिमात्य देशांना जगात आपले वर्चस्व कायम ठेवायचे आहे. त्यांच्यामुळे युक्रेनमध्ये गंभीर संकट निर्माण झाले आहे, असा आरोप त्यांनी केला होता.