Asia Cup : वेगवान गोलंदाज की फिरकीपटू? श्रीलंकेतील मैदानांवर कुणाचं वर्चस्व
Asia Cup 2023 : येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कपला (Asia Cup) सुरूवात होणार असून, ही स्पर्धा यावर्षी हायब्रिड पद्धतीने खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार असून, टीम इंडियाचे (Team India) सर्व सामने श्रीलंकेच्या भूमीवर खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेजमधील सामने कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. जर, टीम इंडिया सुपर 4 साठई पात्र ठरली तर, भारतीय संघाचे सर्व सामने कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत. या दोन्ही मैदानांवर वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंपैकी नेमके कोणाचे वर्चस्व आहे? हे आपण पाहूया.
‘अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट नाही’; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ!
काय सांगतात श्रीलंकेतील मैदानांचे आकडे
या दोन्ही मैदानांवरील गोलंदाजीचे आकडे अतिशय मनोरंजक आहेत. भारतीय प्लेइंग-11 मध्ये 4 वेगवान गोलंदाज हार्दिकसह खेळणार की 3 फिरकीपटू ज्यात जडेजा, कुलदीप, अक्षर हा मोठा प्रश्न आहे. तर, आशिया कपसाठी भारतीय संघात बुमराह, सिराज, शार्दुल, शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि पंड्या असे 6 वेगवान गोलंदाज तर, 3 फिरकीपटू आहेत.
कुणाला दिली जाऊ शकते संधी?
श्रीलंकेत वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळाल्यास भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याशिवाय तीन वेगवान गोलंदाजांना स्थान दिले जाऊ शकते. तर, दुसरीकडे श्रीलंकेच्या खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल ठरल्यास भारताच्या प्लेइंग-11 मध्ये रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांच्यासह अक्षर पटेललाही संधी मिळू शकते.
World Cup 2023 : वर्ल्डकपआधी सरावाचा पेपर; टीम इंडिया ‘या’ दोन संघांना भिडणार
सेकंड फलंदाजी करणाऱ्या संघास फायदा
कँडीच्या मैदानावर वनडे फॉरमॅटमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक फायदा झाला आहे. मात्र, जस जसा खेळ रंगत जातो तशी खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरते. या मैदानावर एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 33 सामने खेळले गेले, ज्यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 18 सामने जिंकले आहेत. तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 14 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
प्रेमदासा मैदानावरील आतापर्यंतच्या सामन्यांच्या संख्येनुसार वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीला फायदेशीर ठरल्याचा इतिहास आहे. परंतु, असे असतानाही अनेक फिरकीपटूंनीही सामने फिरवल्याची नोंद आहे. कोलंबोमध्ये 138 सामने खेळले गेले असून, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 75 सामने जिंकले आहेत. तर, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 55 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी 8 सामन्यांचा निकाल लागला नाही.
भारताच्या चंद्र विजयानंतर मुंबई इंडियन्सचं खास ट्विट; ‘वर्ल्डकप’साठी जोडलं 2019 चं कनेक्शन!
कँडीच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांची चलती
कँडीच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी 33 सामन्यांमध्ये 1493.4 षटके टाकली आहेत. ज्यात 31.15 च्या सरासरीने 271 विकेट घेण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, स्पिनर्सने 1283 षटकात 34.17 च्या सरासरीने आणि 4.95 च्या रनरेटसह 186 विकेट्स घेतल्या आहेत. ही सगळी आकडेवारी लक्षात घेता भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकसह 4 वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देऊ शकतो. तर याच मैदानांवर फिरकीपटूंनीही चांगली कामगिरी केली आहे.
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी संभव्य प्लेइंग 11
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या संभाव्य प्लेइंग-11 मध्ये रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आदींना स्थान दिले जाऊ शकते.