Gen-Alpha मुळे जॉर्जिया मेलोनींसमोर आव्हान; इटलीत 4 हजार 400 कोटींच्या मालमत्तेची जाळपोळ?

Gen-Alpha Giorgia Meloni Italy इटलीमध्ये आंदोलन सुरू असून, त्याचा फटका पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारला बसत आहे.

Gen Alpha Giorgia Meloni Italy

Gen Alpha Giorgia Meloni Italy

‘Gen-Alpha’ poses a challenge for Giorgia Meloni arson attacks on property worth 44 billion euros in Italy : इटलीमध्ये सध्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून, त्याचा फटका पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारला बसत असल्याचे वृत्त आहे. शनिवारी झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. या हिंसाचारात सुमारे 4 हजार 400 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात प्रामुख्याने ‘जेन-अल्फा’ पिढीतील तरुणांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षणासाठी अधिक निधी मिळावा, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

गोकुळच्या निकालात ऐनवेळी ट्विस्ट, तरी सतेज पाटलांनी बाजी मारली, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी समोर

ANSA या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रविवारी पोलिसांनी सुमारे २०० जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोठ्या संख्येने १६ वर्षांच्या आसपासच्या अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, इटलीच्या पंतप्रधानांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. देशात जाळपोळ करणारे लोक राष्ट्रहिताचा विचार करत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, आंदोलनादरम्यान हिंसाचार करणाऱ्यांना त्यांनी दंगलखोर संबोधले.

इटलीत Gen-Alpha पिढीचे आंदोलन कशासाठी?

इटलीतील विद्यार्थी, ज्यांच्यामध्ये जेन-अल्फा पिढीतील तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, त्यांनी सरकारच्या खर्चाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षणापेक्षा शस्त्रास्त्रांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ‘नो वेपन्स’ अर्थात ‘शस्त्रास्त्रे नकोत’ अशी घोषणा दिली आहे. इटलीमध्ये २०२७ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका याकडे लक्ष वेधले जात आहे.

गोकुळवर सतेज पाटलांचा झेंडा; 16 जागांवर विजय, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

उपलब्ध आकडेवारीनुसार, 2024 मध्ये इटलीने आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) सुमारे 4 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली. ही रक्कम अंदाजे 97 अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे 9.21 लाख कोटी रुपये होती. त्याच वर्षी शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर सुमारे 30 अब्ज डॉलर, म्हणजेच २.८ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे वृत्तात नमूद आहे. इटलीचा एकूण संरक्षण खर्च सुमारे 50 अब्ज डॉलर, म्हणजेच 4.75४ लाख कोटी रुपये असल्याचेही सांगण्यात आले आहे. अमेरिका आणि नाटोच्या दबावामुळे संरक्षणावरील खर्च वाढवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. याच खर्चाच्या प्राधान्यक्रमावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.

मेलोनी यांनी विरोधकांवर फोडले खापर

इटलीतील हिंसक घटनांसाठी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना जबाबदार धरल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मते, या नेत्यांनी तरुणांना आंदोलनासाठी चिथावणी दिली आणि त्यामुळे जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंसाचारात सहभागी असलेल्या गटांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, इटलीप्रमाणेच फ्रान्समध्येही आंदोलन आणि हिंसाचाराच्या घटना घडल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. रविवारी फ्रान्समध्ये १,५०० हून अधिक दुकानांना आग लावण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version