गोकुळवर सतेज पाटलांचा झेंडा; 16 जागांवर विजय, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Kolhapur Gokul Election Result 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्य कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Kolhapur Gokul Election Result 2026

Kolhapur Gokul Election Result 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्य कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील समविचारी आघाडीने बाजी मारली आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 16 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. तर महायुतीला फक्त 9 जागा जिंकता आल्याने कोल्हापूरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबर रोजी तब्बल 99.96  टक्के मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. संचालकपदाच्या 25 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात उतरले होते. पहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी –

1. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर
2. बाबासाहेब श्रीपती चौगले
3. उदय निवासराव पाटील
4. बाबासाहेब विष्णू देवकर
5. आबा उर्फ सत्यजित सुरेश पाटील
6. अभिजित प्रभाकर तायशोटे
7. किसन बापूसो चौगले
8. रणधीर विजयसिंह मोरे
9. सचिन दौलतराव घोरपडे
10. विश्वजीत दिनकरराव जाधव
11. राहुल बजरंग देसाई
12. दादासाहेब वसंतराव पाटील
13. विकास पांडुरंग पाटील
14. भिमगौंडा कल्लाप्पा बोरगांवे
15. विद्याधर बाबूराव गुरबे
16. सुभाष बळवंत डोंगरे

महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी –

1. विशाल गोपाळराव पाटील
2. विश्वजीत रणजितसिंह पाटील
3. शहाजी केशव पाटील
4. विश्वासराव आनंदराव इंगवले
5. अंजना केदारी रेडेकर
6. भाग्यश्री धीरज डोंगळे
7. शशिकांत शामराव खोत
8. राजू जयवंतराव आवळे
9. बयाजी देवू शेळके

पुणे जिल्ह्यात 25 हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजन ; साडेपाच लाख टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट-

follow us