Download App

Google Pay 4 जूनपासून बंद होणार, कंपनीचा मोठा निर्णय!

Google Pay : केवळ भारतातच नाहीतर अमेरिकासह इतर देशात लोकप्रिय असणारा ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay बद्दल कंपनीने एक मोठा निर्णय घेतला

Google Pay : केवळ भारतातच (India) नाहीतर अमेरिकासह इतर देशात लोकप्रिय असणारा ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay बद्दल कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कंपनी अमेरिकेत (US) Google Pay बंद करणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Google Pay पेमेंट ॲप अमेरिकेत बंद होणार असून भारतात पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे. आपल्या देशात आज मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार होत आहे. देशात आर्थिक व्यवहार करण्यासाठी लोक वेगवेगळ्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. त्यापैकी एक म्हणजे Google Pay ॲप. देशात Google Pay दुसरे सर्वात लोकप्रिय पेमेंट ॲप आहे.

अचानक कंपनीने अमेरिकेत Google Pay बंद करण्याचा निर्णय का घेतला ? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Google Pay ॲप अमेरिकेत बंद करण्याचा मुख्य कारण म्हणजे कंपनीला अमेरिकेत Google Wallet चा प्रचार करायचा आहे. यामुळे कंपनीने मोठा निर्णय घेत 4 जूनपासून Google Pay अमेरिकेत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, यूजर्ससाठी कंपनीला ऑनलाइन पेमेंट सुलभ करायचे आहे. यामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र भारतात कंपनीला असा धोका पत्करायचा नाही, याचा मुख्य कारण म्हणजे कंपनीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. यामुळे कंपनीने फक्त Google Pay ॲप अमेरिकेत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडे, अमेरिकेत Google Wallet चा वापर Google Pay ॲपच्या तुलनेत 5 पट जास्त आहे मात्र भारतीय बाजारात Google Pay ॲपच्या तुलनेत Google Wallet चा इतका लोकप्रिय नाही. कंपनीने 2024 मध्ये भारतीय बाजारात Google Wallet लाँच केले आहे तर अमेरिकेत 2022 मध्ये Google Wallet कंपनीकडून लाँच करण्यात आले होते.

सोन्याला झळाळी, 10 ग्रॅम खरेदीसाठी खर्च करावे लागणार ‘इतके’ रुपये

कंपनीने सांगितले आहे की, 4 जूनपूर्वी अमेरिकन यूजर्सनी Google Pay ॲप Google Wallet वर शिफ्ट करून घ्यावे. याच बरोबर कंपनीकडून मोठी घोषणा करत Google Wallet ॲप सुमारे 180 देशांमध्ये Google Pay ची जागा घेणारअसल्याची माहिती दिली आहे.

follow us