UPI फ्री मग गुगल पे अन् फोन पे ने 5 हजार कोटी कसे कमावले? जाणून घ्या सिक्रेट!

UPI फ्री मग गुगल पे अन् फोन पे ने 5 हजार कोटी कसे कमावले? जाणून घ्या सिक्रेट!

UPI is free, but how did Google Pay and PhonePe earn 5 thousand crores? Know the secret : आपण दैनंदिन व्यवहारांमध्ये दररोज युपीआय द्वारे पेमेंट करण्यासाठी गुगल पे किंवा फोन पेचा वापर करतो. पण यासाठी गुगल पे किंवा फोन पे काहीही चार्जेस आकारत नाही. तरी देखील या कंपन्यांनी गेल्या वर्षी 5 हजार 65 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पण जर गुगल पे किंवा फोन पे ग्राहकांना व्यवहार कराताना काहीही चार्जेस आकारत नाही. मग ही कमाई त्यांनी नेमकी कशाच्या माध्यमातून केली? त्यांचं सिक्रेट नेमकं काय? जाणून घेऊ सविस्तर…

धक्कादायक, मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसवर अत्याचार, आरोपी पायलटला अटक

स्पीकरमधून कोट्यवधींची कमाई

दुकानांमध्ये ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ते यशस्वी झाल्याचा एका स्पीकरवरून आवाज येतो. ज्यामध्ये गुगल पे किंवा फोन पेवर किती रूपये प्राप्त झाले हे सांगितलं जात. हाच या कंपन्यांसाठी कमाईचा मोठा मार्ग आहे. कारण या दुकानदारांना हे स्पीकर्स कंपन्यांकडून भाड्याने दिले जातात. यासाठी महिन्याला 100 रूपये चार्ज केले जातात. सध्या तर चहाच्या टपरीपासून मोठ्या दुकानांपर्यंत सर्वांकडे असे स्पीकर्स असतात. त्यावरून स्पीकरमधून कोट्यवधींची कमाई होत असणार एवढं नक्की.

नदीतला गाळ काढता काढता योगेश कदमांचा पाय ‘गाळात’; पत्रकार परिषदेत परबांकडून पोलखोल

उदाहरणादाखल पाहिलं तर देशभरात 50 लाखाहून अधिक दुकांनामध्ये जर असे स्पीकर्स असतील तर ₹100 × 50 लाख = ₹50 कोटी महिन्याला आणि 600 कोटी वर्षाला कमावले जाऊ शकतात. यामुळे केवळ पेमेंटची माहितीच नाही तर ब्रॅंडची जाहिरात आणि ग्राहकांमध्ये विश्वास देखील वाढतो.

भारताचा ‘पॅंथर’, प्रत्येक युद्धात कमाल…मिग-21 सप्टेंबरमध्ये होतेय निवृत्त

स्क्रॅच कार्ड्समधून मोठी कमाई

आपल्याला अनेकदा गुगल पे किंवा फोन पे कडून स्क्रॅच कार्ड्स रिवॉर्ड म्हणून दिले जातात. त्यात मोबाईल रिजार्ज, पेट्रोल पंप आणि टिव्हीच्या रिजार्सवर काही प्रमाणात सुट दिली जाते. त्यासाटी काही अटी शर्ती देखील असतात. हे रिवार्ड ग्राहकांसाठी नाही तर कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतात. त्यात काहींवर कॅशबॅकही दिला जातो. कारण या कंपन्यांना संबंधित ब्रॅंड प्रमोशन आणि जाहिरातीसाठी पैसे देतात. त्यामुळे स्क्रॅच कार्ड्स गुगल पे किंवा फोन पेच्या कमाईचा मोठा मार्ग आहे.

भारताचा ‘पॅंथर’, प्रत्येक युद्धात कमाल…मिग-21 सप्टेंबरमध्ये होतेय निवृत्त

कर्जांच्या माध्यमातून केली जाते कमाई

आता पाहुया गुगल पे किंवा फोन पे या सांरख्या कंपन्यांच्या कमाईचा तिसरा मार्ग म्हणजे कर्ज होय. कारण युपीआय आता केवळ पेमेंटचं साधन राहिलेलं नाही. तर त्यात आता लहान व्यवसायांना कर्ज देखील दिले जाते. यासाठी या कंपन्यांना नवीन ग्राहक शोधण्याची गरज नाही. जे ग्राहक युपीआय वापरतात. तेच यांचे बाकी सेवांचा देखील लाभ घेतात. जसे की, मोबाईल, इलेक्ट्रीसिटी, टीव्ही यासारखे बिल पे करणे. तसेच कर्ज देणे यातून या कंपन्यांना बक्कळ कमाई करता येते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube