धक्कादायक, मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसवर अत्याचार, आरोपी पायलटला अटक

Air Hostess Assault : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबईतील (Mumbai) मिरा रोड (Mira Road) परिसरात एका 23 वर्षीय एअर होस्टेसवर (Air Hostess Assault) अत्याचार झाल्याची माहितीसमोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 25 वर्षीय पायलटला अटक केली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, एका परदेशी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीवर तिच्या सहकाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणात नवघर (Navghar) पोलिसांनी गुन्हा दाखल करत 25 वर्षीय पायलटला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोडमध्ये राहणारी 23 वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी एकाच विमान कंपनीत कामाला असून ते दोघेही 29 जूनला लंडनची फेरी पूर्ण करुन मुंबईत परतले होते. रात्री उशीर झाल्याने पीडित तरुणी आरोपीच्या मिरा रोड येथील घरी गेली मात्र याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला असं तरुणीने पोलिसांना सांगितले आहे.
तसेच पायलटने आग्रह केल्यानंतर तरुणीने त्याच्या घरी गेली होती. मात्र आरोपीच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने तिच्या तक्रारीत केला आहे.
पत्त्याची जाहिरात स्किप करायला 42 सेकंद? रोहित पवारांचा कोकाटेंवर दुसरा बॉम्ब!
आरोपी पीडित तरुणीला मागील काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देत असल्याने पीडितेने या प्रकरणाबाबत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.