Download App

डंख छोटा धोका मोठा! चीन, अमेरिकेत ‘या’ आजाराचे थैमान; जगभरात 2.4 लाख रुग्ण

सध्या चीनमध्ये या आजाराचा फैलाव सर्वाधिक आहे. येथे आतापर्यंत चिकनगुनियाचे 7 हजार रुग्ण आढळले आहेत.

Chikungunya in China and America : जगातील अनेक देशांत सध्या चिकनगुनिया आजाराने (Chikungunya in China) थैमान घातलं आहे. या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. या आजाराचा फैलाव पाहता अमेरिकेत ट्रॅव्हल अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या चीनमध्ये या आजाराचा फैलाव सर्वाधिक आहे. येथे आतापर्यंत चिकनगुनियाचे 7 हजार रुग्ण आढळले आहेत. तर जगभरात तब्बल 2.4 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

या आजाराची तीव्रता पाहता अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशनने (CDC) चीनसह अन्य देशांसाठी ट्रॅव्हल अलर्ट जारी केला आहे. CDC ने अमेरिकी प्रवाशांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. चीनमध्ये या आजाराचा फैलाव जास्त आहे. या ठिकाणी प्रवाशांनी जाऊ नये असेच यातून अमेरिका सरकारने सुचवले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सेंट्रल आणि साउथ अमेरिका, आफ्रिका, हिंदी समु्द्र आणि आशिया खंडातील अन्य देशांत या आजाराचे 2.4 लाख रुग्ण आढळले आहेत. यातील 90 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात जून महिन्यापासून आतापर्यंत सात हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. या शहराची लोकसंख्या 78 लाख इतकी आहे. 2019 नंतर हाँगकाँगमध्ये चिकनगु्ण्याचा पहिला रुग्ण अलीकडेच आढळला आहे.

भयंकर! हजारो तरूण आंधळे होत आहेत; डोळ्यांवर ‘कॉर्नियल ब्लाइंडनेस’चं संकट, तज्ज्ञांचा इशारा

कोणत्या देशांसाठी ट्रॅव्हल अलर्ट

सीडीसीने चिकनगुण्याचा वाढता फैलाव पाहता लेव्हल 2 म्हणजेच काळजी घेण्याची गरज असणारी ट्रॅव्हल हेल्थ नोटीस जारी केली आहे. यात दक्षिण अमेरिकेतील बोलिविया, ग्वांगडोंग (चीन), मेडागास्कर, मॉरिशस, मायोट, सोमालिया आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त सीडीसीने अमेरिकी प्रवाशांसाठी ब्राझील, कोलंबिया, भारत, मेक्सिको, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपीन्स आणि थायलंड या देशांसाठीही इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेत चिकनगुण्या सामान्य आहे. सीडीसीच्या माहितीनुसार 2006 आधी अमेरिकेत या आजाराचं प्रमाण खूप कमी होता. 2006-2013 च्या दरम्यान मात्र अमेरिकेत दरवर्षी सरासरी 28 लोकांत हा आजार दिसून येत होता. हे सर्व रुग्ण आशिया, आफ्रिकेतील प्रभावित क्षेत्रांतून अमेरिकेत येणारे अथवा जाणारे प्रवासी होते. सन 2019 नंतर अमेरिकेत या आजाराचे रुग्ण आढळलेले नाहीत. परंतु 2024 मध्ये 199 आणि 2025 मध्ये आतापर्यंत 46 अमेरिकी नागरिकांना या आजाराचे संक्रमण झाले.

भारतात विकलं जाणार नॉनव्हेज दूध; अमेरिका अन् भारतातील डिल नेमकी काय?

follow us