Download App

“राऊतांचं ट्विट, बावनकुळेंचा फोटो” : राजकीय वादात जाणून घ्या, मकाऊमधील कॅसिनोंचा इतिहास

मकाऊ! मुंबईपासून साधारण चार हजार किलोमीटर लांब असलेलं चिनी अखत्यारितील एक छोटसं शहर. छोटं म्हणजे किती? तर मुंबईच्या पाच टक्केही नाही. लोकसंख्या अवघी सहा लाखांच्या घरात. पण याच शहारवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. याचं कारण ठरलं ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. (How Macau is become world’s casino capital)

बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रीपला गेले होते. या दरम्यानचा बावनकुळे यांचा एक फोटो राऊतांनी ट्विट केला. बावनकुळे मकाऊमध्ये एका कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असा दावा या फोटोतून केला. इतकंच नाही तर त्यांनी तिथं तब्बल साडे तीन कोटी रुपये उडवले, असा आरोपही त्यांनी केला. यावर बावनकुळेंनी आणि भाजपच्या नेत्यांनी बराच खुलासा केला. ते तिथे जेवण्यासाठी गेलेले, राऊतांनी चुकीचा फोटो ट्विट केला वगैरे असे खुलासे केले. पण वाद शांत होताना दिसत नाही.

Sanjay Raut : ‘दिडदमडीचे लोक आमच्यावर टोळधाड सोडतात, भाजपा म्हणजे’… राऊतांचा हल्लाबोल

याच कारण आहे मकाऊची असलेली जगभरातील ओळख. हे 33 किलोमीटर भुभाग असलेलं छोटसं शहर जगभरात कॅसिनोची राजधानी म्हणून ओळखले जाते. जगातली सर्वात मोठे कॅसिनो मकाऊमध्येच आहे. मकाऊने ही ओळख मागच्या 24-25 वर्षांतच मिळवली आहे. या दोन अडीच दशकात मकाऊने लास वेगास शहाराला कॅसिनोमध्ये मागे टाकले. मकाऊ प्रशासनाच्या तिजोरीत येणारे जवळपास 81 टक्के उत्पन्न हे कॅसिनो आणि त्यावरील कराच्या माध्यमातून जमा होते.

पण मकाऊने अवघ्या 20-25 वर्षात ही ओळख कशी मिळवली?

मकाऊ हे पहिल्यापासूनच कॅसिनोचे केंद्र नव्हते. पण तिथला इतिहास, तिथली भौगोलिक रचना आणि तिथले सत्ताधीश यांच्यामुळे मकाऊला ही ओळख मिळाली. जगातील अनेक वसाहतींपैकी मकाऊ ही वसाहतही 1557 पर्यंत ब्रिटीशांच्या ताब्यात होती. पण त्यावेळी अफुच्या तस्करीने तिथं टोक गाठलं होतं. त्यानंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिश सरकारमध्ये एक करार झाला. यानुसार ही वसाहत पोर्तुगीजांना व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली. त्या बदल्यात इंग्रजांनी अफूची तस्करी थांबवण्यासाठी मदत मागितली. तिथून मकाऊमध्ये पोर्तुगीजांचे साम्राज्य सुरु झाले.

या दरम्यान, 1840 च्या दशकात मकाऊच्या पोर्तुगीज राजवटीत, स्थानिक प्रशासकांनी राजाच्या तिजोरीला बळकट करण्यासाठी महसूलाचे अतिरिक्त स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली. यातूनच जुगार या संकल्पनेचा जन्म झाला. त्यावेळी एक पुर्तगाली कवि कैमिलो पेसान्हा यांनी लवकरच “मकाऊची छोटी आणि मागास जनता आता भौतिक आणि नैतिक कचऱ्याचा ढीग म्हणून ओळखली जाईल” अशी टीका केली.

पण 19 व्या शतकातील हाँगकाँग आणि दक्षिण चीनमधील रहिवाशांनी कैमिलो पेसान्हा यांच्या जुगाराला विरोध करणाऱ्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. मकाऊमध्ये गर्दी वाढू लागली. जुगारासाठी लोक सीमापार करुन यायला लागले. पोर्तुगीज राजाचा खजिना भरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 1920 च्या आसपास मकाऊमध्ये पहिले अधिकृत कॅसिनो सुरु झाले. तर 1960 च्या दशकात स्टॅनले हो या जुगाराच्या पुरस्कार करणाऱ्या व्यापाऱ्याने कॅसिनोला अब्जावधी डॉलर्सचा उद्योग म्हणून विकसीत करण्यासाठी योग्य वातावरण तयार केले.

स्टॅनले हो यांनी व्यापाराच्या माध्यमातून 60 च्या दशकात गेमिंग मक्तेदारी परवाना प्राप्त केला. यानंतर हो यांनी Sociedade de Turismo e Diversões de Macau (STDM) ची स्थापना केली. याकाळात स्टॅनले यांनी मकाऊच्या भौगोलिक क्षेत्राचा फायदा उचलत मकाऊला कॅसिनोची राजधानी बनवून टाकलं. मकाऊ हे समुद्राच्या किनारी असल्याने लोकांना जहाजांच्या माध्यमातून येणं-जाणं सोपं झालं. श्रीमंत लोकांना जाहजेत कॅसिनो खेळण्याचा आनंद मिळू लागला.

येरवडा तुरुंगातून कुख्यात गुंड पळाला; ललित पाटील प्रकरणी तोंड पोळलेल्या पोलिसांची पुन्हा नाचक्की

मात्र स्टॅनले हो यांच्यानंतर चिनी प्रशासनाने मकाऊला आधुनिक जगातील कॅसोनिची राजधानी ही ओळख मिळवून दिली. पोर्तुगीजांनी नियंत्रण सोडल्यानंतर मकाऊमध्ये गुन्हेगारी शिखरावर गेली होती. यावर उपाय म्हणून 1999 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली मकाऊला ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ अर्थात चीनला परत करण्यात आले. पण इथे चिनी प्रशासनाचे कायदे लागू होत नाहीत. ‘एक देश दोन व्यवस्था’ या सुत्रानुसार मकाऊला 1999 मध्ये विशेष प्रशासकीय क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.

यानंतर बाजाराचे उदारीकरण करण्याच्या आणि मकाऊमध्ये परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या वचनाचा एक भाग म्हणून चीनने इथे जुगार व्यवसाय अधिकृत केला. संपूर्ण चीनमध्ये जुगार आणि कॅसिनो बेकायदेशीर आहेत. पण मकाऊमध्ये कॅसिनो अधिकृत केले. यामुळे पॅसिफिक महासागराच्या पलीकडून मोठे-मोठे लोक मकाऊमध्ये येऊ लागले. त्यांनी कॅसिनो चालवण्यामध्ये आणि तयार करण्यात स्थानिक संस्कृतीपासून प्रेरणा घेऊन त्यांचे कौशल्य आणले.

2001 पर्यंत, मकाऊमध्ये स्टॅनले हो च्या एकाच कंपनीला कॅसिनो चालवण्याचा परवाना होता, पण चिनी प्रशासनाने ही मक्तेदारी मोडून काढली. 2002 पासून, अनेक परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना कॅसिनो परवाने देण्यात आले. यामध्ये ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांना मकाऊमध्ये आल्या. लास वेगासमधील लास वेगास सॅन्ड्स, एमजीएम, गॅलेक्सी आणि विन रिसॉर्ट्स सारख्या कंपन्यांची नावे सांगता येऊ शकतील. त्यांनी मोठ्या आणि नवीन कॅसिनो रिसॉर्ट कॉम्प्लेक्समध्ये, लक्झरी हॉटेल्स आणि हाय-एंड शॉपिंग मॉल्समध्ये मोठी गुंतवणूक केली.

या नवीन कॅसिनोने स्थानिक नागरिकांसाठी काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शिवाय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. पर्यटकांची संख्या वाढली. कर महसूल मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागला. 2001 मध्ये जमा झालेल्या सर्व कर महसुलात गेमिंगमधून मिळणारा महसूल 40% होता. नवीन कॅसिनो उघडल्यानंतर गेमिंग महसुलात सातत्याने वाढ होत गेली. 2014 मध्ये या क्षेत्रातील कर महसूल शिखरावर पोहोचला. 13 वर्षांत हाच आकडा 81 टक्क्यांवर गेला. जुगार आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेल्या मकाऊमध्ये येणारे बहुतांश पर्यटक हे चीनमधून येतात. 2018 मध्ये केवळ 70% पर्यटक चीनमधून आले होते.

Emmy Awards: आंतरराष्ट्रीय पातळीवर जिम सरभने रोवला भारताचा झेंडा; एमी पुरस्कारावर कोरलं नाव

मकाऊमध्ये व्हेनेशियन मकाऊ हा जगातील सर्वात मोठा कॅसिनो आहे. इथे 3,400 स्लॉट मशिन्ससह 546,000 चौरस फुटांवर पसरलेले तब्बल 800 जुगाराचे टेबल आहेत. स्लॉट्स आणि टेबल गेम्ससह 41 हून अधिक कॅसिनो आणि हजारो खाजगी व्हीआयपी खोल्यांची सुविधा मकाऊमध्ये आहे. व्हेनेशियन मकाऊमध्ये 3 हजार VIP रुम्स आहेत आणि शहरातील सर्वात मोठा गेमिंग फ्लोअर आहे. इथे आशियाई लोकांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेले बॅकरेट टेबल, ब्लॅकजॅक आणि क्रेप्स हे गेम खेळण्यासाठी विशेष सोय आहे. संजय राऊत यांनी बावनकुळे याच कॅसिनोमध्ये गेले होते, असा दावा केला आहे.

सांख्यिकी आणि जनगणना सेवाच्या अहवालानुसार 2019 मध्ये मकाऊला 3 कोटी 94 लाख 6 हजार पर्यंटकांनी भेट दिली होती. या पार्श्वभूमवीर चिनी सरकारने आता कॅसिनो गेमिंग रुमच्या पलीकडे जाऊन विविधीकरणास प्रोत्साहन दिले आहे. लास वेगासप्रमाणे इतर एक्झिबिशन्स आणि इव्हेंट आयोजित करण्याचा विचार करीत आहे. शिवाय मकाऊ आणि हाँगकाँगला जोडणाऱ्या नवीन पुलाचे काम केले आहे. या सगळ्यामुळे येणाऱ्या काळात मकाऊला भेट देणाऱ्या पर्यंटकांची संख्या आणखी वाढणार हे निश्चित.

Tags

follow us