मॉस्कोवर शेकडो ड्रोनने हल्ले; रशियाच्या संसदीय निवडणुकीच्या शेवटची दिवशी रक्तपात

Moscow : देशभरात तब्बल 1,600 हून अधिक ड्रोन पाडण्यात किंवा निष्क्रिय करण्यात आले, त्यापैकी सुमारे 450 ड्रोन मॉस्कोला लक्ष्य करणारे होते.

Mosco

Mosco

मॉस्को : रशियातील संसदीय निवडणुकीच्या मतदानाच्या (Russia’s parliamentary election) शेवटच्या दिवशी मॉस्को (Moscow) आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करत शेकडो ड्रोन हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून, एका मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे. रशियन अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांसाठी युक्रेनला जबाबदार धरले आहे.

देशभरात तब्बल 1,600 हून अधिक ड्रोन पाडण्यात किंवा निष्क्रिय करण्यात आले, त्यापैकी सुमारे 450 ड्रोन मॉस्कोला लक्ष्य करणारे होते. युक्रेनवर निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. हा अभूतपूर्व हल्ला निवडणूक विस्कळीत करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता. मात्र, शत्रूला त्यात यश आले नाही. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत 44 वर्षीय महिला आणि एका वृद्ध पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती मॉस्को क्षेत्राचे गव्हर्नर आंद्रे वोरोब्योव्ह यांनी दिली.


मॉस्कोवर शेकडो ड्रोनने हल्ले; रशियाच्या संसदीय निवडणुकीच्या शेवटची दिवशी रक्तपात

मक्कापर्यंत पोहोचला हूतींचा धोका? सौदीसमोर मोठं संकट, पाकिस्तान-तुर्कीची खरी परीक्षा

ड्रोन एका 21 मजली इमारती आदळल्यानंतर आग लागली. या घटनेनंतर सुमारे 400 नागरिकांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, या ड्रोनचा उगम नेमका कुठून झाला, याबाबत गव्हर्नरांनी स्पष्ट माहिती दिली नाही.


तेलशुद्धीकरण प्रकल्पालाही फटका

मॉस्को येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या परिसरातील एका सुविधेचे ड्रोन हल्ल्यात नुकसान झाल्याची माहिती सोब्यानिन यांनी दिली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. या तेलशुद्धीकरण प्रकल्पावर यापूर्वीही युक्रेनकडून हल्ले झाल्याचे रशियाने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत युक्रेनने रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करत लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. रशियाच्या युद्धखर्चासाठी ऊर्जा क्षेत्रातून मिळणारा महसूल महत्त्वाचा स्रोत असल्याने या सुविधांना लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले जाते. युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियाच्या तेलशुद्धीकरण क्षमतेचा मोठा भाग प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील काही भागांमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा, इंधनाच्या किमतीत वाढ आणि पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे वृत्त आहे.

युक्रेनकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
या हल्ल्यांबाबत युक्रेनने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. रशिया आणि युक्रेन दोन्ही देश नागरिकांना लक्ष्य करत नसल्याचे सांगतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रशिया आणि युक्रेनने एकमेकांच्या ऊर्जा सुविधांवर हल्ले न करण्यास सहमती दर्शवल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांतच हा नवा हल्ला झाला आहे.


रशियात संसदीय निवडणूक

रशियात शुक्रवारी मतदानाला सुरुवात झाली. फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरची ही रशियातील पहिली संसदीय निवडणूक आहे. तीन दिवस चाललेल्या या मतदानाचा रविवार हा शेवटचा दिवस होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारला आणि त्यांच्या युक्रेनमधील लष्करी मोहिमेला समर्थन करणाऱ्या पक्षांनाच निवडणुकीत उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. रशियाने युक्रेनच्या ताब्यात घेतलेल्या भागांमध्येही मतदान झाले आहे. पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाचा विजय निश्चित मानला जात असला, तरी या निवडणुकीतून सरकारच्या धोरणांना जनतेचा किती पाठिंबा आहे, याचा अंदाज घेण्याची संधी मिळणार आहे

Exit mobile version