PM Modi in US Meets Elon Musk: टेस्लाचे संस्थापक आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या भेटीनंतर इलॉन मस्क यांनी सांगितले की, टेस्लाच्या भारतातील गुंतवणुकीबाबत आमची चर्चा झाली. पंतप्रधानांना खरोखरच भारताची खूप काळजी आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॅन आहे. मोदींना भारतासाठी खूप काही करायचं आहे.
एलॉन मस्क म्हणाले की भारतात गुंतवणूक करण्यास खूप उत्सुक आहे. जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे अधिक शक्यता आहेत. भारतात विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रात भरपूर क्षमता आहे. पुढील वर्षी ते भारतात येणार आहेत. दरम्यान, मस्क हे स्पेसएक्सचे सीईओ आणि सोलरसिटीचे चेअरमन देखील आहेत. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा ज्यामध्ये ते अमेरिकेतील टॉप 20 कंपन्यांच्या सीईओंना भेटणार आहेत.
Deepak Kesarkar : ‘….तर एकनाथ शिंदेनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती’
एलॉन मस्क पुढं म्हणाले की आम्हाला भारतात मोठी गुंतवणूक करण्यासाठी मोदींनी निमंत्रण दिले आहे. आम्हाला भारतातही मोठी गुंतवणूक करायची आहे. भारतासाठी तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा हा त्यांचा हेतू आहे. भारतात विशेषत: सौरऊर्जेमध्ये भरपूर क्षमता आहे. भारताकडे सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी पुरेशी जमीन आहे. मात्र आता त्यातील एक ते दोन टक्केच वापर होत आहे.
दौंड हादरलं! आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर दोन्ही मुलांना संपवलं अन् शेवटी स्वत:ही घेतला गळफास
Prime Minister Narendra Modi met Tesla and SpaceX CEO Elon Musk, in New York. pic.twitter.com/saKdZwVWpE
— ANI (@ANI) June 21, 2023
भारतातील इंटरनेट क्षेत्रातही काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे देशातील दुर्गम भागात स्वस्त इंटरनेट उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला भारतभेटीचे निमंत्रण दिले होते. मी पुढच्या वर्षी भारतात जाऊ शकतो.