दौंड हादरलं! आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर दोन्ही मुलांना संपवलं अन् शेवटी स्वत:ही घेतला गळफास

दौंड हादरलं! आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर दोन्ही मुलांना संपवलं अन् शेवटी स्वत:ही घेतला गळफास

दौंड : कौटुंबिक वादातून एका डॉक्टर पतीने आपली पत्नी आणि दोन लहान मुलांची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दौंड तालुक्यातील वरंवड गावात (Varanwad village) ही घटना घडली आहे. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (20) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे दौंडसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (First the wife was strangled, then the two children were thrown into the well; A doctor from Daund taluka killed the entire family)

मिळालेल्या माहितानुसार, वरवंड येथील गंगासागर पार्क येथील खोली क्रमांक 201 मध्ये दिवेकर दांपत्य आपल्या मुलांबाळांसह राहत होते. दुपारी एका व्यक्ताने त्यांचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळं सदर व्यक्तीने खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांना डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय 42) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. संबंधित व्यक्तीने आरडाओरड केली असता, परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दार उघडून बघितले असता, अतुल यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचा पल्लवी (वय 35) मृतदेह खाली निपचित पडल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादीनेही केला सर्व्हे, आमचाच पक्ष मोठा होणार असल्याचा जयंतरावांचा दावा… 

या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेचा माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना डॉक्टर दिवेकर आणि त्यांची पत्नी यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी दोन्ही मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली आणि घरी जाऊन स्वत:ही गळफास घेऊन आपली जीवनायात्रा संपवली.

डॉ. दिवेकर यांचा मुलगा आदित अतुल दिवेकर (वय 11) व मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (वय 7) यांचे मृतदेह घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आले. विहीर सुमारे 10 परस इतकी खोल असून 45 फूट एवढे पाणी असल्याने मुलांना वर काढण्यास मोठी अडचण येत असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे वरवंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वरवंड गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube