राष्ट्रवादीनेही केला सर्व्हे, आमचाच पक्ष मोठा होणार असल्याचा जयंतरावांचा दावा…

राष्ट्रवादीनेही केला सर्व्हे, आमचाच पक्ष मोठा होणार असल्याचा जयंतरावांचा दावा…

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीने काँग्रेसनेही सर्व्हे केला असून राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेनूसार राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मोठा होणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आज राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडली. त्यानंतर जयंत पाटील यांनी संवाद साधला.

टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही बेपत्ता, 96 तासांचाच ऑक्सिजन शिल्लक…

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, अलीकडे जे सर्व्हे छापून येत आहेत. त्या सर्व्हेमध्ये काही तथ्य दिसत नाही. कारण आमच्या पक्षानेदेखील खाजगी स्तरावर काही निवडक मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे.
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक मोठा पक्ष आणि लोकांचा अधिक पाठिंबा असणारा पक्ष म्हणून पुढे येत आहे, हाच निष्कर्ष असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला आहे.

आता निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? राष्ट्रवादीने थेट आकडाच सांगितला

राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अनेक मतदारसंघात अतिशय बळकट आहेत. मात्र, काही असत्यावर आधारित सर्व्हेच्या बातम्या महाराष्ट्रात येत आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या काही मतदारसंघातील सर्व्हेची माहिती बैठकीत अवगत केल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांचा वापर :
राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी गद्दार दिवसाच्या आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, आंदोलनाआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता महाराष्ट्रात आंदोलन करायला परवानगी नाही. सरकार विरोधी कुणी बोलू नये, अशी मानसिकता ठेवून पोलिसांचा वापर आंदोलन चिरडण्यासाठी सर्रास सुरु असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजना

राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील आमदारांच्या स्थितीबाबत माहिती घेतली आहे. ज्या जागांवर आम्ही लढवू शकणार आहे त्याच जागांचा सर्व्हे आम्ही केला असल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

बैठकीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रश्नदेखील या बैठकीत मांडल्याचं पाटील यांन सांगितलं आहे. दरम्यान, या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झालेले खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सत्कार करण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube