टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही बेपत्ता, 96 तासांचाच ऑक्सिजन शिल्लक…
समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही अटलांटिक महासागरात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या पाणबुडीत एका नाविकासह इतर चार जणांचा समावेश आहे. सिर्फट टाईटन असं या पाणबुडीचं नाव असून पाणबुडीने समुद्रात डुबकी घेतल्यानंतर दोन तासांतच संपर्क तुटला आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी एजन्सीच्या पाणबुडीसह अमेरिका, कॅनडाच्या नेवी फोर्सकडून प्रयत्न केले जात आहेत.
पाध्येंच्या बाहुल्या राजकीय चर्चेत : अर्धवटराव, ना-आवडाबाई अन् ठाकरेंचे फडणवीसांच्या जखमेवर मीठ
ओशनगेट नामक कंपनीच्या या छोट्या पाणबुडीमध्ये पाच जण गेले होते. नाविकसह पाकिस्तानचे उद्योगपती प्रिन्स दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान आणि ब्रिटीश उद्योगपती हमिश हार्डिंग यांचा समावेश आहे. दरम्यान, टायटॅनिकच्या शोधासाठी निघालेल्या हार्डिंग यांनी जाण्याआधी सोशल मिडियावर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये ते म्हणाले, “मला हे सांगताना अभिमान वाटतो की मी, टायटॅनिकच्या मोहिमेचा एक भाग असल्याचं ते म्हणाले होते.
Ganesh Sugar Factory Election; ‘ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा’, थोरातांचा विखेंवर हल्लाबोल
तसेच पाणबुडीच्या प्रवासाला गेलेल्यांपैकी प्रिंन्स दाऊद हे पाकिस्तानातील श्रीमंत कुटुंबापैकी एक आहेत. ते SETI संस्थेचे विश्वसही आहेत. तर या पाणबुडीच्या पायलटचे नाव पॉल हेन्री असून तो फ्रान्सचा रहिवासी आहे. या पाणबुडीमध्ये प्रवास करण्यासाठी पर्यटकाला 2 कोटी 28 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. हा प्रवास न्यूफाउंडलंडमधील सेंट जॉन्सपासून सुरू होत असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
वर्धापन दिनी एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना धक्का, महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार
या पाणबुडीचे वजन 10432 किलो असून पाणबुडी 13100 फूट खोलीपर्यंत पोहोचू शकते. या पाणबुडीमध्ये प्रवाशांसाठी 96 तासांसाठीच ऑक्सिजन आहे.
दरम्यान, 1912 मध्ये ब्रिटनहून अमेरिकेला जाणारे टायटॅनिक समुद्रातील एका हिमखंडावर आदळले होते. त्यावेळी जहाजावर एकूण 2200 लोक होते, त्यापैकी सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 1985 मध्ये टायटॅनिक जहाजाचे अवशेष सापडले होते तेव्हापासूनच हे अवशेष पाहण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.