Imran Khan arrested :पाकिस्तानातील परिस्थिती काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नाही आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सुप्रीम कोर्टातून (Supreme Court) जामीन मिळाल्याने आता इम्रान खानविरोधी राजकीय पक्ष एका एकत्र आले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानला फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ अहमद खान म्हणाले, इम्रान खान यांना जाहीर फाशी दिली पाहिजे, पण न्यायालये त्यांचे जावई असल्यासारखे त्यांचे स्वागत करत आहेत.
इम्रान खानच्या सुटकेवरून पाकिस्तान सरकार आणि देशाचे सरन्यायाधीश यांच्यात तणाव वाढला आहे. सरकारने पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खानच्या सुटकेविरोधात पीडीएमने सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शने सुरू केली आहेत. एवढेच नाही तर संतप्त जमावाने तेथे आपला तळ ठोकला आहे.
DRDO Case : कुरूलकरांनंतर एअरफोर्सचा अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात; चौकशीत धक्कादायक खुलासे
दरम्यान, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) ही अनेक पक्षांची संघटना आहे. त्यात सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUIF) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यासह अनेक पक्षांचा समावेश आहे.
इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयच्या वतीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पीटीआयचे सुमारे 7000 कार्यकर्ते, नेते आणि महिलांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टावर कब्जा करण्यासाठी आणि राज्यघटना नष्ट करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा गुंडांना मदत करत आहेत. सर्वांनी शांततेने आंदोलन करण्यास तयार राहा, कारण एकदा का संविधान आणि सर्वोच्च न्यायालय नष्ट झाले की पाकिस्तानचे स्वप्न संपुष्टात येईल.
पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या जामिनावरुन वातावरण तापलं; सर्वोच्च न्यायालयालाच घेरलं
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून निमलष्करी रेंजर्सनी अटक केली होती. इम्रान खान एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावणीसाठी न्यायालयात आले होते. यानंतर संपूर्ण पाकिस्तानात हिंसाचार पसरला होता. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवली. यानंतर इम्रान खानला इस्लामाबाद हायकोर्टातून जामीन मिळाला होता.