Download App

PTI Banned : शाहबाज सरकारचा मोठा निर्णय; इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’वर पाकिस्तानात बंदी!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर पाकिस्तानात बंदी घालण्याचा निर्णय शाहबाज शरीफ सरकारकडून घेण्यात आलायं

PTI Banned : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) PTI पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलायं. शाहबाज शरीफ सरकारने पीटीआयवर बंदी घातलीयं. पाकिस्तानविरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत पीटीआयवर बंदी घालण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलीयं.

पाकचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार म्हणाले, पाकिस्तानविरोधात पीटीआय पक्षाकडून कथित कारवाया करण्यात येत आहेत. त्यामुळे या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात येणार आहे.

भुजबळ-पवार भेटीमुळे महायुतीत मिठाचा खडा, बावनकुळे म्हणाले, ‘महायुतीचं नुकसान होईल असं…’

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला असून इम्रान खान पत्राच्या महिला आणि अल्पसंख्यांकांसाठी राखीव असलेल्या 20 पेक्षा अधिक जागांना पात्र घोषित केल्यानंतर हा निर्णय आलायं. त्यामुळे आता पीटीआय हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्यास मार्ग मोकळा झालायं. तर सत्ताधारी दोन तृतीयांश बहुमत गमावण्याची शक्यता आहे.

इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईचे पक्के पुरावे आमच्याकडे आहेत. परकीय निधी, दंगल, सायपर एपिसोड, ही सर्व प्रकरणे पीटीआयवर बंदी घालण्यासाठी विश्वासार्ह असल्याचं माहिती प्रसारण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, पाकिस्तानातील पीटीआय हा सर्वात मोठा आणि जुना पक्ष मानला जातो. सध्यस्थितीत हा पक्ष विरोधक असून 1996 मध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आलीय. इम्रान 2018 ते 2022 पर्यंत पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांना अल कादीर प्रकरणी अटक झाली.

follow us