Brazil Ex President Jair Bolsonaro Sale Expensive Gifts : तोषाखाना भेटवस्तू प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता असेच काहीसे प्रकरण ब्राझीलमध्येही उघडकीस आले आहे. ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारोदेखील तोषाखाना प्रकरणात अडकले आहेत. इम्रान खान यांच्याप्रमाणेच त्यांनीही करोडो रूपयांच्या भेटवस्तू विकत मिळालेली रक्कमेवर डल्ला मारला आहे. जैर यांनी त्यांना मिळालेली दोन घड्याळे विकली असून, याचे बाजार मूल्य करोडो रूपयांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन
बोल्सोनारो राष्ट्राध्यक्ष असताना सौदी अरेबियाने त्यांना दोन मौल्यवान घड्याळे भेट म्हणून दिली होती. ही दोन्ही घड्याळे विकून त्यांनी 70 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 6 कोटी रुपयांची माया मिळवली. मिळवलेली ही रक्कम बोल्सोनारो यांनी सरकारी तिजोरीत जमा करण्याऐवजी स्वतःकडे ठेवली. या सर्व प्रकरणाचा तपास ब्राझील फेडरल पोलीस करत असून, या प्रकरणात सहभागी असणाऱ्या ब्राझील लष्कराच्या 4-स्टार जनर्लसनाही चौकशीला सामोरे जावे लागू शकते. परंतु, बोल्सोनारो यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
जैर बोल्सोनारो यांची आधीच चौकशी सुरू
जैर बोल्सोनारो हे ब्राझीलचे वादग्रस्त नेते आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक खटले सुरू असून, तोषाखाना प्रकरणामुळे त्यांच्या अचणींमुळे येत्या काळात वाढ होऊ शकते. बोल्सोनारो यांची राष्ट्रीय राजधानीत त्यांच्या समर्थकांनी केलेल्या दंगलीची तसेच अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या कृतींची चौकशी केली जात आहे.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर भेटवस्तूंचा लिलाव: जमा होणारी रक्कम गरीबांना वाटणार
लष्कराच्या जनरलने भेटवस्तू विकल्या
या सर्व प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, बोल्सोनारो यांचे सहकारी, लेफ्टनंट कर्नल मौरो सिड यांनी जून 2022 मध्ये यूएसमधील एका स्टोअरला रोलेक्स घड्याळ आणि 2019 मध्ये सौदी अरेबिया सरकारने दिलेले घड्याळ विकल्याचे समोर आले आहे.