Download App

Imran Khan: इम्रान खानची मजा! तुरुंगात मिळत आहे ‘ही’ सुविधा

Imran Khan : गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात बंद असणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात अनेक प्रकारचे सुविधा देण्यात येत

Imran Khan : गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात बंद असणारे पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तुरुंगात अनेक प्रकारचे सुविधा देण्यात येत असल्याची माहिती पाकिस्तान सरकारने (Pakistan Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दिली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात रंगीत टीव्ही, स्वतंत्र स्वयंपाकघर, व्यायामाची साधने यासोबतच त्यांना बॅरेकजवळ चालण्याची जागा आणि इतर सुविधा देण्यात येत असल्याची माहिती पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पीटीआय संस्थापक आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात बंद आहे. त्यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांना 5 ऑगस्ट 2023 रोजी अटक करण्यात आली होती. 30 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात इम्रान खान यांनी आपण एकांतवासात राहत असल्याची तक्रार सरन्यायाधीशांकडे केली होती. त्यांना वकील आणि कुटुंबीयांना भेटण्यास बंदी घालण्यात आल्याची तक्रार देखील त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली होती.

या प्रकरणात उत्तर देत पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयात इम्रान खान यांना मिळणाऱ्या सुविधांची यादी सादर करत त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. याच बरोबर सरकारकडून इम्रानच्या सेल आणि इतर वस्तूंसोबतच त्याच्या कायदेशीर टीमसोबत तुरुंगात झालेल्या भेटीचे फोटोही सर्वोच्च न्यायालयात पाकिस्तान सरकारने दिले आहे तसेच इम्रानला भेटलेल्या व्यक्तींची यादीही सरकारने न्यायालयात दिली आहे.

‘मराठ्यांना चुनाच लावायचे काम शरद पवारांनी केले पण चुना लावणारा माणूस…’, सदाभाऊ खोतांची टीका

याच बरोबर गरज भासल्यास इम्रानच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली जाऊ शकते असेही सरकारने न्यायालयात सांगितले आहे.

follow us

वेब स्टोरीज