इम्रान खान जिवंत आहेत का? मृत्यूच्या अफवांमध्ये बहिणींना मारहाण; पाकिस्तानमध्ये गोंधळ

Imran Khan Death Rumors : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या करण्यात आली असल्याची चर्चा पाकिस्तानी मीडियामध्ये

Imran Khan Death Rumors

Imran Khan Death Rumors

Imran Khan Death Rumors : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या करण्यात आली असल्याची चर्चा पाकिस्तानी मीडियामध्ये होत आहे. इम्रान खान यांच्या हत्येबाबत अफगान मीडियामध्ये दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्याबद्दल पसरलेल्या अफवांनंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. इम्रान खानच्या तीन बहिणींनी दावा केला आहे की त्या गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्या भावाला भेटू शकल्या नाहीत आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या भावाला भेटण्याची मागणी केली तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

इम्रान खानच्या (Imran Khan Death Rumors) बहिणी, नूरिन खान, अलिमा खान आणि उज्मा खान यांनी दावा केला आहे की त्यांना पोलिसांनी मारहाण केली. तर इम्रान खाने समर्थक मोठ्या संख्येने रावळपिंडीतील आदियाला तुरुंगाबाहेर जमले असून घोषणाबाजी करत आहे. इम्रान खान 2023 पासून तुरुंगात बंद असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षातील लोक आणि बहिणी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे मात्र पोलीस त्यांना भेटू देत नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

गेल्या तीन आठवड्यात कोणीही इम्रान खानची (Imran Khan) भेट घेतलेली नाही. त्यांच्या पक्षाचा, पीटीआयचा (PTI) दावा आहे की, इम्रान खानचे समर्थक आणि बहिणी तुरुंगाबाहेर निदर्शने करत असताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली. पक्षाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

इम्रान खान यांच्या बहिणींना मारहाण

पंजाब पोलिस प्रमुख उस्मान अन्वर यांना लिहिलेल्या पत्रात, इम्रान खानच्या बहिणींनी म्हटले आहे की त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कोणत्याही चिथावणीशिवाय मारहाण करण्यात आली. नूरिन नियाझी यांनी लिहिले आहे की, आम्हाला इम्रान खानच्या प्रकृतीची चिंता आहे. म्हणूनच आम्ही शांततेत निदर्शने करत होतो. आम्ही कोणतेही रस्ते अडवले नाहीत किंवा जनतेला कोणतीही गैरसोय केली नाही. कोणताही बेकायदेशीर कृत्य घडले नाही. तरीही, पोलिसांनी कोणत्याही चिथावणीशिवाय आमच्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पंजाब पोलिसांचा हा क्रूर हल्ला होता. 71 व्या वर्षी मला केसांनी ओढले गेले आणि मारहाण झाली असं त्यांनी या पत्रात लिहिले आहे.

Nilesh Lanke : ग्रामीण भागात ‘बिबट्या’च्या भीतीचे सावट…, लंकेंची महावितरणकडे महत्त्वाची मागणी

माजी पंतप्रधान इम्रान खानच्या हत्येच्या बातम्या अफगाणिस्तानातील माध्यमांमध्येही आल्या आहेत. मात्र आतापर्यंत पाकिस्तान सरकार, लष्कर किंवा तुरुंग प्रशासनाकडून कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. यामुळे इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल आणि ते जिवंत आहेत की नाही याबद्दल चिंता वाढत आहे. इम्रान खान यांचे वकील खालिद युसूफ चौधरी असेही म्हणतात की ते इम्रान खान यांना भेटू शकले नाहीत. त्यांना आवश्यक वस्तू देखील मिळू दिल्या जात नाहीत.

Exit mobile version