अमेरिकेची भारतासह काही देशांना उघड धमकी; रशियाकडून तेल खरेदी करू नका, अन्यथा…

Donald Trump on Oil Buying : जगभरात सध्या तणावाचं वातावरण आहे. (Trump) याचा कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम होते आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीवरून आता अमेरिकेने भारतासह काही देशांना उघड धमकी दिली आहे. भारत, चीन आणि ब्राझीलने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे बंद केलं नाही तर तुमच्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान सहन करावं लागेल असं अमेरिकेने म्हटलं आहे. […]

अमेरिकेची भारतासह काही देशांना उघड धमकी; रशियाकडून तेल खरेदी करू नका, अन्यथा...

अमेरिकेची भारतासह काही देशांना उघड धमकी; रशियाकडून तेल खरेदी करू नका, अन्यथा...

Donald Trump on Oil Buying : जगभरात सध्या तणावाचं वातावरण आहे. (Trump) याचा कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम होते आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीवरून आता अमेरिकेने भारतासह काही देशांना उघड धमकी दिली आहे. भारत, चीन आणि ब्राझीलने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे बंद केलं नाही तर तुमच्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान सहन करावं लागेल असं अमेरिकेने म्हटलं आहे.

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी एका मुलाखतीत इशारा देताना म्हटले की, जर तुम्ही रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून युक्रेनविरुद्धच्या युद्धाला खतपाणी घालत राहिलात तर आम्ही तुमची अर्थव्यवस्था नष्ट करू. हे देश रशियाकडून तेल खरेदी करून, स्वतःचा फायदा पाहत आहेत आणि रशियालाही पाठिंबा देत आहेत. कारण भारत, चीन आणि ब्राझील हे तीन देश रशियाचे सुमारे 80 % तेल खरेदी करत आहेत, त्यामुळे रशियाला चांगला आर्थिक फायदा होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा 22 देशांना दणका, टॅरिफची पत्रे धाडली; 50 टक्के टॅक्स अन्..

लिंडसे ग्राहम आणि रिचर्ड ब्लूमेंथल यांनी संसदेत एक विधेयक सादर केले आहे, ज्यात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% पर्यंत टॅरिफ लादण्याची तरतूद आहे. याचा अर्थ भारत, चीन किंवा ब्राझील रशियाकडून तेल खरेदी करत राहिले तर या देशांच्या वस्तूंवर 500 टक्के कर लावला जाईल, ज्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल.

ग्राहम यांच्या मते, या विधेयकामुळे केवळ रशियालाच नव्हे तर त्याच्यासोबत व्यापार करणाऱ्या देशांनाही धडा शिकवेल. आतापर्यंत या विधेयकाला 85 खासदारांनी पाठिंबा दिसा असल्याचेही समोर आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही रशियासह इतर देशांना इशारा दिला आहे. जर रशियाने पुढील 50 दिवसांत युक्रेनसोबत युंद्धबंदीचा निर्णय घेतला नाही तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 % टॅरिफ (आयात कर) लादण्याचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारताने बोलणी सुरु केली आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, भारत रशियाकडून आपल्या गरजा लक्षात घेऊन तेल खरेदी करत आहे. भारतीय दूतावास आणि राजदूतांनी ग्राहम यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. आम्ही आमच्या समस्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. यापुढेही आम्ही या मुद्द्यावर चर्चा करु असंही त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version