अमेरिका अन् भारतात दोन मोठे करार; अंतराळासह आकाशात दिसणार ताकद

PM  Modi visit US :  पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष एच लॉरेन्स कल्प जूनियर यांची गुरुवारी (२२ जून) भेट झाली. या बैठकीनंतर जेट इंजिनांबाबत ऐतिहासिक करार जाहीर करण्यात आला. अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात हा करार जाहीर करण्यात आल्याची […]

Letsupp Image   2023 06 22T182841.677

Letsupp Image 2023 06 22T182841.677

PM  Modi visit US :  पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष एच लॉरेन्स कल्प जूनियर यांची गुरुवारी (२२ जून) भेट झाली. या बैठकीनंतर जेट इंजिनांबाबत ऐतिहासिक करार जाहीर करण्यात आला.

अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात हा करार जाहीर करण्यात आल्याची माहिती एरोस्पेस शाखेने दिली. या करारानंतर जेई एरोस्पेस आणि एचएएल मिळून भारतीय हवाई दलासाठी जेट इंजिन बनवतील.

Monsoon Update : आनंदाची बातमी! उद्यापासून पावसाची शक्यता, 24 जूनपासून जोर वाढणार; हवामान विभागाची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष एच लॉरेन्स कल्प ज्युनियर यांची भेट झाल्यानंतर काही तासांनी जनरल इलेक्ट्रिकने घोषणा केली, “भारतीय हवाई दलाला जेट इंजिन पुरवण्यासाठी त्यांची कंपनी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात करार झाला आहे.”

भारत-अमेरिकेने 2024 साठी संयुक्त अंतराळवीर मिशनची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने गुरुवारी (२२ जून) सांगितले की भारताने आर्टेमिस करारात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे आणि यूएस स्पेस एजन्सी नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम सुरू करणार आहेत. एक संयुक्त मोहीम पाठवण्यास सहमती दर्शविली आहे.

Monsoon Update : आनंदाची बातमी! उद्यापासून पावसाची शक्यता, 24 जूनपासून जोर वाढणार; हवामान विभागाची माहिती

मंगळ आणि इतर ग्रहांवर अवकाशाचा शोध घेण्याच्या उद्दिष्टासह 2025 पर्यंत मानवांना चंद्रावर परत आणण्याचा हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील प्रयत्न आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, नासा आणि इस्रो या वर्षी मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी एक धोरणात्मक फ्रेमवर्क तयार करत आहेत. ते म्हणाले की, याशिवाय नासा आणि इस्रोने 2024 मध्ये आयएसएसच्या संयुक्त मोहिमेवरही सहमती दर्शवली आहे.

 

Exit mobile version