Download App

India Canada Row : निज्जरच्या हत्येनंतर कॅनडातील हिंदूंना 1985 सारखी भीती; वाचा काय घडलं होतं?

  • Written By: Last Updated:

India Canada Row : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या (HardeepSingh NIjjar) हत्येनंतर भारत आणि कॅनडा या दोन्ही देशामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीने या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत आहे ते बघता कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू समुदायामध्ये 1985 चे वर्ष आठवत वेगळ्याच भीतीचे काहूर माजले आहे. 1985 मध्ये नेमकं असं काय घडले होते. ज्याची आठवण सध्याच्या परिस्थितीत पुन्हा एकदा डोके वर काढू लागली आहे.

भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?

हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर शिख फॉर जस्टिसने हिंदू समुदायाला कॅनडा सोडून जाण्याचा इशारा दिला आहे तेव्हापासून येथील हिंदू समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या धमकीमुळे हिंदू समुदाय चिंतेत असल्याचे कॅनेडियन हिंदू फॉर हार्मनीचे प्रवक्ते विजय जैन यांनी म्हटले आहे. या धमकीमुळे येथे 1985 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती येथील हिंदूंच्या मनात आहे.

1985 मध्ये नेमकं काय झालं होते?

1985 मध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी एअर इंडियाच्या मॉन्ट्रियल-लंडन-दिल्ली-मुंबई फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवला होता. विमान आयर्लंडच्या किनार्‍याजवळ असताना स्फोट झाला अन् विमानात प्रवास करणाऱ्या 22 क्रू मेंबर्ससह 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक नागरिक हे कॅनडाचे नागरिक होते आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी ते भारतात येत होते.

NIA च्या मोस्‍ट वॉन्‍टेड लिस्‍टमधील खलिस्तान्यांना मदत करणाऱ्या गँगस्टर सुखदूल सिंगचा खात्मा

या हल्ल्याच्या स्मरणार्थ कॅनडामध्ये दरवर्षी 23 जून रोजी राष्ट्रीय स्मृती दिन साजरा केला जातो. या हल्ल्याप्रकरणी इंद्रजित सिंग रयत, रिपुदमन सिंग मलिक आणि अजयब सिंग बागरी या तिघांची नावे समोर आली होती. यापैकी इंद्रजित हा एकमेव आरोपी आहे ज्याला तुरुंगात शिक्षा झाली होती.

ट्रुडोंनी 300 हून अधिक प्रवाशांचा बळी घेणाऱ्याला सोडले

ट्रूडो यांनी 2015 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली त्यानंतर त्यांनी मजबुरीमध्ये किंवा राजकीय खेळीच्या उद्देशाने 300 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या इंद्रजित सिंगला 2016 मध्ये तुरूंगातून सोडण्याचा निर्णय घेतला. ट्रुडो एकमेव असे नेते नाहीत ज्यांनी अशाप्रकारे बळी घेणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांना सोडले आहे. ट्रुडो यांच्यापूर्वीही अनेक सत्ताधाऱ्या नेत्यांनी खलिस्तान्यांना सोडले आहे.

Justin Trudeau : जस्टिन ट्रूडो अन् वाद विवाद; पंतप्रधान असतानाच घेतला होता घटस्फोट…

1984 मध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ वर इंदिरा सरकारची कारवाई

1984 मध्ये भिंद्रनवाले यांची हत्या आणि खलिस्तान चळवळ (ऑपरेशन ब्लू स्टार) संपवण्यासाठी इंदिरा गांधी सरकारने मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे खलिस्तानवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली होती. त्यावेळीदेखील कॅनडामधील हिंदू समुदायातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ऑपरेशन ब्लू स्टारला प्रत्युत्तर म्हणून विमानात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे मानले जाते.

विमान बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

एअर इंडियाच्या कनिष्क विमानाव्यतिरिक्त इंद्रजित सिंग आणि त्याच्या साथीदारांनी आणखी एका विमानात बॉम्ब ठेवला होता. ज्याचा जपानमधील नारिता विमानतळावर स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटामागे इंद्रजितसह आणखी दोन आरोपींचा समावेश होता. मात्र, ठोस पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. तर, या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या रिपुदमन सिंग मलिक याची ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेचा तपास कॅनडाच्या पोलिसांनी अद्याप पूर्ण केलेला नाही.

Tags

follow us