भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?

  • Written By: Published:
भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला. या गंभीर आरोपांनंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव शिगेला पोहोचला असून, आता भारताने पुढील आदेशापर्यंत कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातली आहे. ट्रुडो यांच्या आरोपांनंतर आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या असून, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं हे आपण जाणून घेऊया. (India Canada Tension Over Hardeep Singh Nijjar Murder )

हिंदूंनो, कॅनडा सोडून भारतात जा; खलिस्तानी-दहशतवाद्याने कॅनडास्थित भारतीयांना धमकावलं

निज्जरच्या हत्येनंतर काय काय घडलं?

निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याच्या आरोपांनंतर कॅनडा सरकारने तेथील ओटावा येथील सर्वोच्च भारतीय मुत्सद्दी पवन कुमार राय यांना निलंबित केले. कॅनडाच्या या कारवाईला त्याच भाषेत भारताकडून प्रत्युत्तर देत कॅनडाचे नवी दिल्लीतील उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्यांना 5 दिवसांत देश सोडण्यासही सांगण्यात आले.

शिवशक्ती पॉइंटवर हालचालींना वेग; विक्रम लँडर अन् प्रज्ञान रोव्हरसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे म्हणत कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये कोणत्याही परदेशी सरकारचा सहभाग हे आमच्या सार्वभौमत्वाचे अस्वीकार्य उल्लंघन असल्याचे ट्रुडो यांनी संसदेत म्हटले होते. मात्र, ट्रुडो यांनी केलेले सर्व आरोप भारताकडून फेटाळण्यात आले. तसेच ट्रूडो यांनी केलेले आरोप म्हणजे कॅनडात आश्रय घेत असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.

पवन कुमार राय यांची हकालपट्टी

ट्रुडो यांच्या विधानानंतर ओटावा येथील सर्वोच्च भारतीय मुत्सद्दी पवन कुमार राय यांची हकालपट्टी करण्यात आली. ते पंजाब केडरचे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, सध्या ते कॅनडातील भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंगमध्ये (RAW) स्टेशन चीफ म्हणून कार्यरत होते. यानंतर भारताने याला प्रत्युत्तर देत परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीस्थित कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी करत त्यांना 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Politics : शिंदे अपात्र ठरल्यास CM कोण? अजितदादा, विखे, गडकरीही रेसमध्ये

भारताच्या टिट फॉर टॅट नंतर ट्रुडोंची भूमिका बदलली

राय यांची हकालपट्टी करण्याच्या कॅनडा सरकारच्या निर्णयानंतर भारताकडूनही याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले. भारताच्या या कारवाईनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भूमिका काहीशी मवाळ झाली. भारत सरकारने हा मुद्दा योग्यरित्या हाताळावा अशी भूमिका ट्रुडो यांनी घेतली. आम्ही भारताला उकसवण्याचे किंवा खलिस्तानी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत नसल्याचेही ट्रूडो यांनी म्हटले.

अमेरिकसह अन्य देशांची भूमिका नेमकी काय?

भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते अॅड्रिन वॉटसन म्हणाले की, ‘पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांमुळे अमेरिका अत्यंत चिंतेत असून, हत्येचा तपास पूर्ण होऊन आरोपी पकडले जाणे आता महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे कॅनडा आणि भारतातील वादातही ब्रिटन आणि भारत सरकारमधील व्यापर चर्चा सुरूच राहणार असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असताना अधिक भाष्य करणे अयोग्य ठरेल.

फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे; आमदारांना उद्देशुन राऊतांची जिव्हारी लागणारी टीका

परराष्ट्र मंत्रालयाकडून अ‍ॅडव्हायझरी जाहीर…
खलिस्तानी दहशतवाद्यांकडून येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडात असलेल्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनात म्हटलं की, “कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथं अंतर्गत प्रवास करु इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! कॅनडातील सर्व व्यवसाय बंद करण्याचा महिंद्रांचा निर्णय

तसेच कॅनडामधील जो भाग संवेदनशील आहे, अशा भागांत ज्या ठिकाणई भारतीय अधिकाऱ्यांना टार्गेट केलं गेलं आहे. त्या भागांत कॅनडास्थित भारतीयांनी संभाव्य प्रवास टाळण्याचा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतीयांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अ‍ॅडव्हायझरीचे पालन करणे आवश्यक आहे.

कॅनडा सरकारकडूनही अ‍ॅडव्हायझरी 

खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या सरकारने पुन्हा एकदा भारताला डिवचले आहे. जस्टीन ट्रुडो सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतातील जम्मू काश्मीर या राज्यात प्रवास टाळण्याचा सल्ला या अ‍ॅडव्हाजरीत देण्यात आला आहे.

सुरक्षेच्या कारणांमुळे कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. या भागात दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे, असे या अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे. मात्र यामध्ये केंद्रशासित प्रदेश लद्दाखचा उल्लेख केलेला नाही. कॅनडाच्या नागरिकांनी इशान्य भारतातील मणिपूर, आसाम या राज्यांतही जाऊ नये असे कॅनडा सरकारने म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube