बीजिंग : जी-20 परिषदेच्या बैठकीसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी किन गांग यांची भेट घेतली व दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे. भारत व चीन यांना आपल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये सीमा वादाच्या मुद्द्याला योग्यरितीने हाताळले पाहिजे व सीमा भागातील स्थिती कशी सामान्य राहील यासाठी मिळुन काम केले पाहिजे, असे गांग यांनी जयशंकर यांना म्हटले आहे.
लदाखच्या पूर्व भागामध्ये गेल्या 34 महिन्यांपासून सीमा विवाद सुरु आहे. यानंतर नवी दिल्लीत जी-20 परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या संमेलनामध्ये गांग व जयशंकर हे पहिल्यांदा समोरा-समोर आले आहेत. डिसेंबरमध्ये किन गांग यांनी वांग यी यांच्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्री पदाचा पदभार सांभाळला आहे.
यावर जयशंकर यांनी देखील आपली भुमिका मांडली आहे. भारत व चीन या देशांमधील संबंध हे अस्थिर आहेत. याचे कारण या दोन देशांमधील संबंध हे सीमा भागात शांती प्रस्थापित करण्यावर अवलंबून आहेत, असे जयशंकर म्हणाले आहेत. तसेच जी-20 परिषदेमध्ये काय होते आहे, यावर देखील आम्ही विस्तृत चर्चा केली आहे. पण आमची मुळ चर्चा ही द्विपक्षीय संबंध व द्विपक्षीय संबंधातील अडचणी कशा दूर करता येतील यावर झाली असल्याचे जयशंकर म्हणाले आहेत.
किन यांनी देखील जयशंकर यांना दोन्ही देश व दोन्ही देशातील नेत्यांमध्ये संवाद असला पाहिजे असे म्हटले आहे. आपल्यातील विवादांना व्यवस्थित सोडवले पाहिजे व द्विपक्षीय संबंधांला चालना द्यायला पाहिजे असे किन यांनी म्हटले आहे. दरम्यान जी-20 अध्यक्षतेला पूर्ण करण्यासाठी चीन भारताचे पूर्ण समर्थन करत असल्याचे देखील किन यांनी म्हटले आहे.
Women’s Day : महिला दिनानिमित्त चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘झिम्मा’