Women’s Day : महिला दिनानिमित्त चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘झिम्मा’

Women’s Day : महिला दिनानिमित्त चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘झिम्मा’

मुंबई : गेल्या वर्षी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांना आणि विशेषतः महिला प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. यावर्षी पुन्हा एकदा हा चित्रपट महिला दिनानिमित्त चित्रपटगृहात झळकणार आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘झिम्मा’ 2 येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

त्या दरम्यान आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आठवड्यावर चित्रपटगृहांत झळकणार आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

VT 13 : मानुषी छिल्लर आणि वरूण तेज दिसणार ‘या’ चित्रपटात एकत्र

‘माझं या चित्रपटाशी एक भावनिकदृष्ट्या नातं जोडलं गेलं आहे. हा चित्रपट मी पुन्हा एकदा महिलादिनी माझ्या मैत्रिणीसोबत बघून साजरा करणार आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा त्याच जोमात प्रदर्शित होणार आहे, याचा मला आनंद आहे. महिलांना हा चित्रपट आपल्या जीवनाशी भावनिकदृष्ट्या जवळीक साधणारा वाटला. अनेकींनी हा चित्रपट पाहून संसारातून वेळ काढत आपल्या मैत्रिणींसोबत सहलींचा बेतही बनवला. ज्या स्त्रिया कधीच चित्रपटगृहात गेल्या नव्हत्या, त्या खास ‘झिम्मा’ बघायला गेल्या. अनेकींनी यांचे हे अनुभव प्रत्यक्ष, सोशल मीडियाद्वारे, मेसेज करून आमच्यापर्यंत पोहोचवले. आयुष्य भरभरून जगायला शिकवणारा हा चित्रपट आहे.’ अशी प्रतिक्रिया अभिनेत्री क्षिती जोगने दिली आहे.

‘चलचित्र कंपनी’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube