India Maldives Tension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द वापरले. मालदीव सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेत टीका करणाऱ्या मंत्री शिउनासह आणखी दोन मंत्र्यांना (Ministers) निलंबित केले. मात्र तरीदेखील हा वाद शांतता झालेला नाही. मालदीवमधील विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले असून आता थेट राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
PM Modi यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना; प्लॅटफॉर्म सर्चमध्ये 3,400 टक्क्यांनी वाढ
मालदीवमधील अल्पसंख्याक नेत्यांनी ही मागणी केली आहे. मोइज्जू यांना पदावरून हटवण्यासाठी मदत करावी. मालदीवच्या परराष्ट्र धोरणात स्थिरता आणण्यासाठी मालदीवियन डेमोक्रॅटिक पक्ष कटिबद्ध आहे, असे अल्पसंख्यांक नेते अझीम यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी तयार आहात का, असे त्यांनी देशातील प्रमुख नेत्यांना विचारले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, असे माजी राष्ट्राध्यक्ष अहमद अदीब यांनी सांगितले होते.
मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भारतीय प्रचंड संतापले होते. सोशल मीडियावर भारतीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला. देशात सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड करू लागला. यानंतर अनेक लोकांनी आपली मालदीव यात्रा (Maldives Tour) रद्द केल्याचेही सांगितले. मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावरच अवलंबून आहे. यात भारतीय पर्यटकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सरकारला मंत्र्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. विरोधी पक्षांनीही मंत्र्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका केली होती. या मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही या नेत्यांनी केली होती.
मोदींवरील टीका भोवली, तीन मंत्र्यांची हकालपट्टी; भारतीयांसमोर ‘मालदीव’ सरकार झुकले
या वादानंतर मालदीव सरकार सध्या डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात आहे. हा वाद सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष मोइज्जू चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. यानंतर त्यांनी याच महिन्याच्या अखेरीस भारत दौरा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मालदीवमध्ये ज्याची सत्ता येते त्याचा पहिला दौरा भारताचा असतो अशी आतापर्यंतची परंपरा राहिली आहे. मात्र मोइज्जू यांनी ही परंपरा मोडीत काढली. त्यांनी भारताआधी चीन, तुर्की, युएई या देशांचा दौरा केला होता.