World Population Report : जगात लोकसंख्या वेगाने (World Population) वाढत चालली आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत आशिया खंडातील देशांत लोकसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यातही भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये लोकसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे. नुकताच एक अहवाल हाती आला आहे. या अहवालात भारतासह (India Population) अन्य देशांत एक दिवसात किती मुलांचा जन्म होतो याची माहिती नमूद करण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार भारतात दररोज सरासरी 63 हजार 169 मुले जन्माला येतात. जगात हा जन्मदर सर्वात जास्त आहे. या बाबतीत भारताने आता चीनला सुद्धा (China) मागे टाकले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दीर्घकाळ नंबर एक वर राहणारा चीन आता दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
सध्या चीनमध्ये दररोज सरासरी 29 हजार 205 मुलं जन्म घेत आहेत. चीनमध्ये भारताच्या तुलनेत जन्मदर कमी झाला आहे. आता सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्यासाठी चीन सरकार नागरिकांना जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे चीनमध्ये वृद्ध लोकसंख्या वाढू लागली आहे. ही एक नवी समस्या येथे निर्माण झाली आहे.
Gold ETF म्हणजे काय? फायदा किती? कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या, डिटेल..
चीनला मागे टाकून आता भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनला आहे. भारतात सध्या दररोज सरासरी 63 हजार 169 मुले जन्माला येत आहेत तर चीनमध्ये दररोज 29 हजार 205 मुले दररोज जन्माला येत आहेत.
भारताचा शेजारी पाकिस्तानचा (Pakistan Population) विचार केला तर रिपोर्टनुसार या देशात दररोज सरासरी 17 हजार 738 मुले जन्माला येत आहेत. भारत आणि चीनच्या तुलनेत हा आकडा खूप कमी आहे. परंतु अनेक देश याबाबतीत पाकिस्तानच्या खूप मागे आहेत.
जगात एक दिवसात सर्वात कमी मुले लेक्झेमबर्ग या देशात जन्माला येतात. रिपोर्टनुसार या देशात एक दिवसात फक्त 18 बालकांचा जन्म होतो. भारताचा शेजारी देश भूतानमध्ये एका दिवसात फक्त 26 बालके जन्म घेतात. तर कतर या देशात एक दिवसात फक्त 65 बालके जन्माला येतात.
भारत-पाक तणावात गुडन्यूज; भोजनाची थाळी झाली स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क!