Gold ETF म्हणजे काय? फायदा किती? कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या, डिटेल..

Gold ETF म्हणजे काय? फायदा किती? कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या, डिटेल..

Gold ETF Investment : गोल्ड इटीएफला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF Investment) असे सुद्धा म्हटले जाते. या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक (Digital Gold) करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याची काहीही गरज नाही. याआधी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ईटीएफ आणि Sovereign गोल्ड असे दोन पर्याय होते. परंतु आता सरकारने Sovereign Gold बंद केलं आहे. आता ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या माध्यमातून सोने खरेदी करता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊ की ईटीएफ गोल्ड म्हणजे नक्की काय..

ईटीएफ गोल्ड एक प्रकारचा कमोडिटी बेस फंड आहे. या माध्यमातून गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने खरेदी न करता गुंतवणूक करू शकतो. ईटीएफ गोल्ड शेअर प्रमाणेच स्टॉक एक्सचेंजमध्ये (Stock Exchange) खरेदी करू शकता. येथेच विकताही येते. या माध्यमातून कमीत कमी किमतीवर सोने खरेदी करता येऊ शकते. या सोन्याचे प्रत्येक युनिट प्रत्यक्षातील एक ग्रॅम सोन्याच्या बरोबरीची असते. यामधून मिळणारा परतावा सुद्धा फिजिकल गोल्ड प्रमाणेच असतो. एका वर्षात तुम्हाला सोन्यातून जितका परतावा मिळेल तितकाच परतावा तुम्ही ईटीएफ गोल्डमध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता.

सिबील स्कोअर ओके तरीही बँक कर्ज देत नाही? तुम्हालाही आलाय अनुभव, मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच!

ईटीएफ गोल्डमध्ये कशी कराल गुंतवणूक

शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात आधी एक डिमॅट खाते उघडावे लागते. अशाच पद्धतीने गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक डिमॅट खात्याशी आवश्यकता राहील. जर खाते नसेल तर तुम्हाला गुंतवणूक करता येणार नाही. कोणत्याही ब्रोकरेज ऍपच्या माध्यमातून गोल्ड ई करणे ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचे फायदे

गोल्ड ईटीएफमध्ये तुम्हाला एक सुरक्षा प्रदान केली जाते जी फिजिकल गोल्डमध्ये शक्यतो मिळत नाही. कारण यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात सोने खरेदीची गरज नसते. त्यामुळे सोने चोरी किंवा हरवण्याचे टेन्शन राहत नाही.

ईटीएफ गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी किमतीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये खरेदी युनिटच्या हिशोबाने होत असते. यामध्ये तुम्ही एक युनिट म्हणजेच एक ग्रॅम सोने खरेदी करूनही गुंतवणूक करू शकता.

यामध्ये मिळणारा परतावा अन्य म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त असतो. कारण हा परतावा सोन्याच्या दराच्या हिशोबाने दिला जातो. गोल्ड ईटीएफला तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट करून याला अधिक डायव्हर्सिफाय करू शकता.

विचार करा! जगात दरवर्षी होतेय 105 कोटी टन अन्नाची नासाडी; ‘या’ देशात सर्वाधिक अन्न वाया

follow us
  • fb
  • instagram
  • youtube