World Population : नववर्षाच्या पहिल्याचं दिवशी जगाची लोकसंख्या 800 कोटीं पार ; 2023 मध्ये किती वाढ? वाचा…
World Population : 2024 हे नववर्ष अगदी काही तासांवर येऊन ठेपलेय त्या नववर्षाचे स्वागत जगातील तब्बल 800 कोटी लोक करणार आहेत. होय हे खरंय नववर्ष सुरू होईल. त्यावेळी जगाची लोकसंख्या (World Population) 1 जानेवारी 2024 ला तब्बल 800 कोटींचा आकडा ओलांडणार आहे. कारण 2023 मध्ये जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.
KBC 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात आलं पाणी; म्हणाले, ‘देवियो और सज्जनो…’
जानेवारी 2024 ला जगाची लोकसंख्या 8,019,876,189 इतकी झालेली असेल. तर 2023 मध्ये या लोकसंख्येमध्ये 75,162,541 लोकांची भर पडली. आहे. अमेरिकेच्या लोकसंख्या ब्युरोच्या अहवालामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे 2023 मध्ये वाढलेली जगाची लोकसंख्या ही तज्ञांना देखील चकित करणारी ठरली आहे. कारण एकीकडे जागतिक लोकसंख्येचे प्रमाण हे सेकंदाला 4.3 जन्म आणि दोन मृत्यू असा असून दुसरीकडे जागतिक विकास दर मात्र काही वर्षांच्या तुलनेत 2023 मध्ये एक टक्क्याने कमी झालाय. त्यामुळे या लोकसंख्या वाढीवर जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Year Ender 2023 : सरत्या वर्षात लँडमार्क ठरलेले सर्वोच्च न्यायालयाचे पाच निकाल…
तर दुसरीकडे कोरोना साथीचा देखील लोकसंख्या वाढीवर परिणाम झाला आहे. जननदर घटला असून लैंगिक गुणोत्तरांमध्ये देखील घट झाली आहे. त्याचबरोबर 2021 मध्ये जागतिक सरासरी आयुष्यमान कमी होऊन ते 71 वर्षांवर आले. त्यामुळे या अगोदर जगाच्या लोकसंख्येने 100 कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी अकरा वर्षे लागली होती. मात्र ती यावेळी शंभर कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी म्हणजेच 800 कोटींहून 900 कोटी होण्यासाठी 14 वर्षांवरून अधिक काळ लागणार आहे. असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
जगभरातील या लोकसंख्येमध्ये भारतीय लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं. तर यामध्ये भारताचा वाटा हा अंदाजे 142.8 कोटी आहे. 1960 ते 1980 या दरम्यान भारताची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली. त्यामध्ये 2021 मध्ये भारतामध्ये कोरोनाच्या साथीमुळे जनगणना झालेली नाही. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येचा नेमका आकडा सांगता येत नाही. तर युरोप ची लोकसंख्या 74.4 अमेरिकेची 100 कोटी आहे.