Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन हल्ला

Houthi Drone Attack : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धात उतरलेल्या हुती बंडखोरांनी आता समुद्रातील जहाजांना (Houthi Drone Attack) टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका भारताच्या जहाजाला बसला आहे. लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. याआधी गुजरात समुद्र किनाऱ्या जवळ असलेल्या जहाजावरही हल्ला करण्यात आला […]

Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन हल्ला

Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन हल्ला

Houthi Drone Attack : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धात उतरलेल्या हुती बंडखोरांनी आता समुद्रातील जहाजांना (Houthi Drone Attack) टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका भारताच्या जहाजाला बसला आहे. लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. याआधी गुजरात समुद्र किनाऱ्या जवळ असलेल्या जहाजावरही हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला ईराणने केल्याचे सांगण्यात आले होते.

लाल समुद्रातील हल्ल्याची माहिती देताना यूएस सेंट्रल कमांडने सांगितले की, 23 डिसेंबर रोजी दक्षिण लाल समुद्रात दोन जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हे क्षेपणास्त्र हुती बंडखोरांच्या नियंत्रणातील येमेनमधून डागण्यात आले. या हल्ल्यात जहाजाचे कोणतेही नुकसान झाले नाही. येमेनी वेळेनुसार, दुपारी 3 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान यूएसएस लॅबून ही युद्धनौका ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियनचा भाग म्हणून लाल समुद्रात गस्त घालत होती. गस्तीदरम्यान चार ड्रोन हुती नियंत्रित भागातून जहाजाच्या दिशेने डागण्यात आली. परंतु, त्यांना खाली पाडण्यात यश मिळाले.

France : भारतीय प्रवाशांचे विमान फ्रान्सने रोखले, प्रवाशांची कसून चौकशी; धक्कादायक कारण समोर

या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रिपोर्टनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता अमेरिकन कमांडल दोन जहाजांवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये एमव्ही साईबाबा या भारतीय जहाजाचा समावेश होता. या जहाजावर भारताचा झेंडा होता परंतु, हे जहाज गॅबॉनच्या मालकीचे आहे. भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की भारतीय ध्वज असलेले हे जहाज नाही. या जहाजात 25 भारतीय क्रू मेंबर आहेत. हा कच्च्या तेलाचा टँकर आहे. ज्यावर ड्रोन हल्ला करण्यात आला.

दरम्यान, याआधी भारतीय किनारपट्टीजवळ शनिवारी एका जहाजावर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. पेंटागॉनच्या अहवालानुसार, हा हल्ला इराणने केला होता. गुजरात किनारपट्टीपासून 370 किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. घटनेच्या वेळी भारतीय नौदल आणि तटरक्षक दल मदतीसाठी पोहोचले. याबाबत इराणने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Oscar 2024 मधून एव्हरीवन इज हिरो बाहेर, एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन नाही, चाहते नाराज

Exit mobile version