अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे सरकारी निवासस्थान व्हाइट हाऊस जवळील बॅरियरला ट्रकची धडक देणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मान्य केले की तो राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना इजा करण्याच्या उद्देशाने आला होता. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला 19 वर्षीय साई वार्षित कंदुला हा मिसौरी येथील रहिवासी आहे. व्हाइट हाऊस जवळील बॅरियना ट्रक धडकावल्याच्या कारणामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
व्हाइट हाउसचे प्रेस सचिव काराइन जीन पियरे म्हणाले, ज्यावेळी ट्रकची बॅरियर्सना धडक झाली त्यावेळी राष्ट्रपती बायडन व्हाइट हाउसमध्येच होते. काही महत्वाच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. या घटनेची त्यांना तत्काळ माहिती दिली गेली नव्हती.
दुर्देवी घटना! झोपेत असतानाच हॉस्टेलला लागली आग; 19 विद्यार्थीनींचा होरपळून मृत्यू
पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात असे संकेत मिळाले आहेत की आरोपीने जाणूनबुजून धडक दिली होती. घटनास्थळावर अधिकाऱ्यांनी नाजी झेंडेही जप्त केले आहेत. यावेळी आरोपीने व्हाइट हाउसबद्दल काही धमकीवजा वक्तव्येही केली. त्यानंतर त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. टक्कर देणाऱ्या वाहनांत हत्यारे किवा कोणताही विस्फोटक पदार्थ आढळून आला नाही. या घटनेमुळे कुणालाही दुखापत झाली नाही. वॉशिंग्टन पोलिसांनी ट्रकही जप्त केली आहे.
अमेरिकेत अशा घटना वारंवार घडत आहेत. गोळीबाराच्या घटना तर सातत्याने घडत आहेत. आताही दोनच दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. अशा प्रकारच्या घटनांमध्ये निरपराध लोकांना नाहक जीव गमवावा लागत आहे. या घटनांमुळे अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मार्क झुकरबर्गला युरोपियन युनियनचा झटका ! युझर्सचा डेटा विकल्याप्रकरणी ठोठावला मोठा दंड
त्यावेळी नेमकं काय घडलं ?
साई वर्षित कंदुला असे या युवकाचे नाव आहे. तो सेंट लुईसमधल्या चेस्टरफिल्ड येथील रहिवासी आहे. त्याने सोमवारी रात्री 10 वाजता एक ट्रक व्हाइट हाऊसच्या सिक्युरिटी बॅरिकेट्सवर चढवल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ येथे उपस्थित एका जणाने काढला. त्यामुळे हा प्रकार समोर आला. त्याने दोन वेळा ट्रक बॅरिकेट्सवर चढवला त्यामुळे मोठा आवाज झालाा. पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. इंडियन एक्सप्रेसने असोसिएटेड प्रेसच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.