Download App

..तर गंभीर परिणामांना तयार राहा, तालिबानची पाकिस्तानला खुली धमकी; नेमकं काय घडलं?

अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारची घुसखोरी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे.

Pakistan News : अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार आणि पाकिस्तानात पुन्हा (Pakistan News) मोठा वाद उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तालिबान सरकारने पाकिस्तानला कडक शब्दात (Taliban) धमकावले आहे. अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारची घुसखोरी (Afghanistan) केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने दिला आहे. खरे तर तालिबान चिडण्याला सुद्धा पाकिस्तानच जबाबदार आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी अफगाणिस्तानला डिवचणारे वक्तव्य केले होते. पाकिस्तान एक नव्या मोहिमेअंतर्गत अफगाणिस्तानातील टीटीपी ठिकाणांवर आक्रमण करू शकतो असे वक्तव्य असिफ यांनी केले होते.

त्यांच्या या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानने पाकिस्तानला थेट धमकीच दिली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी सांगितले की आमच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची घुसखोरी मग ती कोणत्याही उद्देशाने असो जर झाली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याचे उल्लंघन करणाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. अशा प्रकारची वक्तव्ये पाकिस्तानी नेतृत्वाने टाळली पाहिजेत असे तालिबान सरकारने स्पष्ट केले.

Pakistan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा; दोन्ही देशांत नक्की काय शिजतंय?

खरंतर पाकिस्तान सरकार आणि सेना टीटीपी संघटनेच्या कारवायांनी हैराण झाले आहे. यातील हल्लेखोर पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करून अफगाणिस्तानात जाऊन लपतात. पाकिस्तान सरकारने तालिबान सरकारला या हल्लेखोरांना आश्रय देऊ नका असे अनेकवेळा सांगितले होते. मात्र या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे पाकिस्तानने नव्या मोहिमेची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.

व्हॉईस ऑफ अमेरिकेला दिलेल्या मुलाखतीत असिफ यांनी सांगितले की पाकिस्तान सरकारने ही मोहीम खूप विचार करून सुरू केली आहे. देशातील आर्थिक अडचणींचा विचार करून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमअंतर्गत सीमापार असणाऱ्या टीटीपी ठिकाणांना टार्गेट केले जाऊ शकते. ही मोहीम आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणारी नाही कारण अफगाणिस्तान पाकिस्तानात अतिरेकी पाठवत आहे. तसेच त्यांना देशात आश्रय देत आहे. अशा वेळी आम्ही त्या आतंकी ठिकाणांवर हल्ले करून ते उद्धवस्त करू शकतो असे त्यांनी सांगितले होते.

Pakistan News : कंगाल पाकिस्तानला गुडन्यूज! ‘आयएमएफ’ने केली मोठ्ठी घोषणा

follow us