Iran Attacks US Airbase In Qatar : इराणकडून कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हवाई हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, इराणकडून या तळावर 6 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहे.
वृत्तानुसार, कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद हवाई तळावर (Al Udeid Air Base) अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अमेरिकन हवाई तळ कतारमधील अल उदेद आहे. येथे 10,000 हून अधिक कर्मचारी आहेत आणि ते सेंटकमचे फॉरवर्ड मुख्यालय म्हणून काम करते. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, इराणने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर अमेरिका आता कोणते पाऊल उचलणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.
US bases in Qatar are within range of Iranian missiles.🔥 pic.twitter.com/miCfmBFX6c
— Yemen Military🇾🇪 (@Yemenimillitary) June 23, 2025
तर दुसरीकडे इराणकडून काही तासांपूर्वी सीरियामध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या तळावर हवाई हल्ले करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीनुसार, इराणने अमेरिकेला योग्य उत्तर दिले आहे. इराणने सीरियातील (Syria) अमेरिकेच्या लष्करी तळाला टार्गेट केले आहे. इराणकडून हा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला असल्याची माहिती महेर न्यूज एजन्सीकडून (Maher News Agency) देण्यात आली आहे.
मोठी बातमी, पुण्यात ठाकरेंना धक्का, माजी आमदार महादेव बाबर सोडणार साथ
अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन अणु तळांवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर देत आता इराणने अमेरिकेच्या लष्करी तळावर हवाई हल्ले करण्यात येत आहे.