इराणमध्ये ‘मोसादची किलर मशीन’ ठरलेली महिला गुप्तहेर…

इराणमध्ये ‘मोसादची किलर मशीन’ ठरलेली महिला गुप्तहेर…

फ्रान्समध्ये जन्मलेली आणि मूळची ज्यू असलेली कॅथरिन इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेसाठी काम करणारी एक अत्यंत कुशल गुप्तहेर होती. तिने आपली ओळख पूर्णपणे बदलली—इस्लाम स्वीकारला, शिया पंथात प्रवेश केला, आणि स्वतःला कट्टर मुस्लिम महिला व पत्रकार म्हणून सादर केलं. इराणमध्ये गेल्यावर तिने केवळ धर्मांतरच केलं नाही, तर इराणच्या राजकीय आणि लष्करी उच्चवर्गात आपलं स्थान निर्माण केलं. तिच्या लेखांना इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या अधिकृत वेबसाईटवर स्थान मिळालं, आणि ती राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रायसी यांची मुलाखत घेणारी पत्रकार म्हणून प्रसिद्ध झाली. या सर्व काळात ती मोसादसाठी गुप्तपणे काम करत होती

इराण-इस्रायल युद्ध; अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमध्ये इराणच्या अणू केंद्रांची राखरांगोळी

इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित महत्त्वाच्या शास्त्रज्ञांशी तिची ओळख झाली. कॅथरिनने इराणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये विश्वास संपादन केला. विशेषतः महिलांच्या गाठीभेटी, घरगुती संवाद, आणि खासगी मैत्री यांचा तीने मोठ्या कौशल्याने वापर केला. अनेक अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांकडून तिने त्यांच्या पतींच्या हालचाली, सुरक्षा व्यवस्था, आणि गुप्त माहिती मिळवली.. या साऱ्या माहितीचं दस्तऐवजीकरण करून तीने मोसादकडे पाठवलं. तिच्या या माहितीमुळे इराणमधील अणुशास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींवर अचूक हल्ले करण्यात आले. अपघात, विषबाधा, किंवा अचानक मृत्यू – या सर्व घटनांमध्ये एक समान धागा होता, तो म्हणजे…. कॅथरिन काही काळ त्या सर्वांच्या संपर्कात होती. या हल्ल्यांमध्ये अनेक जण ठार झाले, आणि इराणच्या गुप्तचर यंत्रणांना मोठा धक्का बसला.  .

कॅथरिनने अत्यंत हुशारीनं आपली ओळख लपवली होती. ती इराणमधील सुरक्षित भागात सहजपणे प्रवेश करत होती, तिथे फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाची कागदपत्रं गोळा करत होती. हे सर्व पुरावे ती मोसादकडे पाठवत होती. तिच्या माहितीच्या आधारावर इराणच्या अणु, अभियांत्रिकी आणि शास्त्रीय क्षेत्रातील नऊ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. इराणच्या गुप्तचर संस्थांना सुरुवातीला काहीच संशय आला नाही, कारण कॅथरिनने आपली भूमिका इतक्या सफाईने वठवली होती.

मोठी बातमी! इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिका, इराणच्या 3 अणू प्रकल्पांवर बॉम्ब हल्ले

मोसादमध्ये महिला गुप्तहेरांना अत्यंत कठोर प्रशिक्षण दिलं जातं. अभिनय, भाषाशैली, शस्त्र हाताळणी, तणावाखाली काम करण्याची क्षमता – या सर्व गोष्टींमध्ये त्या पारंगत असतात. कॅथरिनसारख्या एजंट्सना मिशनसाठी दीर्घकाळ गुप्त ठिकाणी राहावं लागतं. इराणमध्ये दोन वर्षं राहून कॅथरिनने आपली ओळख इतकी पक्की केली होती, की तिच्यावर कोणताही संशय आला नाही.

शेवटी, इराणच्या गुप्तचर संस्थांना तिच्या हालचालींचा मागोवा लागला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. कॅथरिन अचानक गायब झाली. तिचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. ती इराणमधून बाहेर पडली आणि कुठे लपली आहे, हे अजूनही गूढ आहे. तिच्या मिशनमुळे इराणमध्ये भीतीचं आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.

ही कथा कुठल्याही थरारपटापेक्षा कमी नाही. कॅथरिन पेरेझच्या मिशनमुळे इराणमध्ये गोंधळ माजला, शास्त्रज्ञांचे प्राण गेले, आणि मोसादच्या महिला गुप्तहेरांच्या क्षमता पुन्हा एकदा जगाला दिसल्या. आजही कॅथरिन कुठे आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. पण तिच्या नावाने इराणच्या गुप्तचर संस्थांना अजूनही धडकी भरली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube